आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढिसाळ वाहतूक नियोजनाची दखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महामोर्चासाठी वाहतूक विभागाच्या फसलेल्या नियोजनाची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. शनिवारी निघालेल्या महामोर्चासाठी वाहतूक विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले होते. या सर्व प्रकारास जबाबदार वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची शक्यता आहे.
बहुजन समाजाच्या महामोर्चाला झालेल्या लाखोंच्या गर्दीने आयोजकांसह पोलिस यंत्रणाही अवाक् झाली. नोटाबंदीने महामोर्चाला गर्दी कमी होण्याची शक्यता गृहीत धरून शहर वाहतूक विभागाने केवळ ज्या मार्गावरून मोर्चा निघेल त्याच मार्गावरील वाहतूक बंद करीत गर्दी लक्षात घेत वाहतूक बंद करण्याचे तोंडी आदेश वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, सकाळी ११ वाजेपासून मोर्चासाठी नागरिकांची गर्दी झाली.

मोर्चा मार्गासह शहरातील सर्वच रस्त्यांवर मोर्चातील नागरिकांचे जत्थे येत असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. पोलिस प्रशासनाने मोर्चासाठी आठ दिवसांपासून बंदोबस्ताचे नियोजन केले होते. आयोजकांसोबत पाच ते सहा मीटिंग घेत मोर्चासाठी पोलिस सज्ज झाले. मात्र, वाहतूक विभागाचा स्वतंत्र कारभार हाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी मात्र मोर्चाला गर्दी होणार नसल्याने काहीच नियोजन केले नसल्याने शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाली.

बातम्या आणखी आहेत...