आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त अाज वाहतूक मार्गात बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. १४) वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावरील सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सायंकाळी ते मिरवणूक संपेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे अावाहन वाहतूक विभागाने केले आहे.
 
डॉ. जयंती मिरवणूक मोठा राजवाडा, वाकडीबारव, कादीर चौक, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, अब्दुल हमिद चौक, भद्रकाली मार्केट, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा, रेडक्रॉस, सांगली बँक सिग्नल, नेहरू गार्डन, व्यापारी बँक, देवी मंदिर, शालिमार, शिवाजीरोड या मिरवणूक मार्गावर वाहतूक बंद राहील.

पर्यायी मार्ग : दिंडोरीनाका, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नलमार्गे शालिमार सीबीएसकडे जाणारी वाहने दिंडोरी नाका येथून पेठ फाटा, सिग्नल, रामवाडी पूल, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी चौकमार्गे नवीन नाशिक नाशिकरोडकडे जातील.
बातम्या आणखी आहेत...