आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्तश्रृंग गड घाटात दरड काेसळली; कारचे नुकसान, 15 ते 20 मिनिटांत वाहतूक सुरळीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळवण - तालुक्यातील सप्तशृंग गडाच्या घाट रस्त्यावर रविवारी सकाळच्या सुमारास दरड काेसळल्याने एका कारचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत काेणतीही जीवितहानी झाली नाही. गडावरील युवकांनी रस्त्यावरील दरड त्वरीत हटवून वाहतूक १५ ते २० मिनिटांत सुरळीत केली. पुणे येथील वसंतराव संपतराव घाडगे हे भाविक परिवारासह सप्तशृंग देवीच्या दर्शनासाठी सियाज कारने जात हाेते. याचवेळी त्यांच्या गाडीवर दरड काेसळल्याने गाडीचे थाेडे नुकसान झाले. 

घटनेची माहिती मिळताच गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके मित्रपरिवाराने दरड हटविण्याचे काम केल्याने वाहतूक पूर्ववत झाली. गडावर संरक्षक जाळी बसविण्यात अाली तशाच प्रकारे घाट रस्त्यावरील धाेक्यांच्या जागी जाळी बसविण्याची मागणी होत अाहे. 
 
सप्तश्रृंग गड घाटात दरड कोसळल्यामुळे एका भाविकाच्या कारचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी १५ ते २० मिनिटांत वाहतूक सुरळीत केली. 
बातम्या आणखी आहेत...