आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षणार्थी परिचारिकांनाच अाता अनाराेग्याची बाधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थपर्वणी काळात भाविकांच्या अाराेग्यासाठी एकाही सुटीविना कार्यरत प्रशिक्षणार्थी परिचारिकांनाच आजारी पडल्यास वेळेवर उपचार मिळणे, शारीरिक कष्टाच्या तुलनेत जेवणाचा दर्जा निकृष्ट, सातत्याने तणाव, विश्रांती नाही अशा अनेक गाेष्टी त्यांचेच स्वास्थ्य बिघडण्यास कारणीभूत ठरल्या असल्याचे सांगितले जाते. तिसऱ्या पर्वणीनंतर सुरुवातीला १५ प्रशिक्षणार्थींची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने उपचार मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र एकही तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्याकडे फिरकलाही नसल्याचे काहींनी दबक्या अावाजात सांगितले. अखेर उपचारासाठी प्रशिक्षणार्थी आणि कार्यरत परिचारिकांनाच धाव घ्यावी लागली. दरम्यानच्या काळात, एका प्रशिक्षणार्थीचा मृत्यूही हाेऊन तणावपूर्ण परिस्थितीही निर्माण झाली हाेती. जिल्हा रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे अद्यापपर्यंत ३५ ते ४० मुलींचे स्वास्थ्य बिघडले असून, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘डी.बी. स्टार’ प्रतिनिधीने रुग्णालय वसतिगृहात पाहणी केली असता, या प्रशिक्षणार्थी त्यांच्या पालकांनी समस्यांचा पाढाच वाचला. अनेक पालक तर पाल्याला घेऊन निघून गेल्याचे अन‌् अनेक प्रशिक्षणार्थींचे पालक त्यांच्या रुग्णालयात दाखल पाल्यांसाेबत या समस्यांना ताेंड देत असल्याचे दिसून अाले. बहुतांश पालकांनी पुन्हा पाल्याला प्रशिक्षणासाठी या ठिकाणी पाठवण्यास नकारही दर्शवला.

वरिष्ठांचा भार कनिष्ठांवर
परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय वसतिगृहाकडे वरिष्ठांकडून लक्ष दिले जात नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या अाहेत. या ठिकाणी १०८ मुली सात मुले आहेत. त्यांच्याकडून सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सलग साेळा-साेळा तास काम करवून घेतले गेल्याचे सांगण्यात अाले. त्याचबराेबर शिक्षा म्हणून घेतलेल्या सुटीचीही सुटी म्हणून नाेंद करण्याचा प्रकारही घडत असल्याचे सांगण्यात अाले. या प्रशिक्षणार्थींवर अतिरिक्त कामाचा असा ताण असताना वरिष्ठ मात्र केवळ बसून राहत असल्याचे अारोपही अाहे. माेबाइल वापरावर बंदी असून, नातेवाईकांनाही भेटण्यास मनाई अाहे, त्याचप्रमाणे वरिष्ठांकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचेही अनेक प्रशिक्षणार्थींनी सांगितले. सुटी मागितल्यास किंवा चुकल्यास कमी गुण, खराब अहवाल देण्याची धमकी वरिष्ठांकडून दिली जात असल्याची तक्रारदेखील काही प्रशिक्षणार्थींनी ‘डी.बी. स्टार’ प्रतिनिधीकडे केली.

प्रशिक्षणार्थींवर अाता स्वयंपाकाचाही भार
एका प्रशिक्षणार्थी मुलीच्या मृत्यूनंतर वसतिगृहातील अनेक बाबी प्रकाशात अाल्या. त्यातीलच एक बाब म्हणजे, वसतिगृह सुरू झाल्यापासून प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून जेवणासाठी दरमहा ५०० अितरिक्त घेतले जात हाेते. मात्र, आता जेवणाची सोय स्वत: प्रशिक्षणार्थींनीच करावी असे आदेश नुकतेच वरिष्ठांकडून देण्यात अाहेत, अशी माहिती एका प्रशिक्षणार्थीने दिली. यामुळे अाता दैनंदिन जबाबदारीबराेबरच स्वयंपाकाचा भारही त्यांना साेसावा लागेल.

उशिरा आल्यास जेवण नाही
जिल्हाशासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय वसतिगृहामधील प्रशिक्षणार्थींना कर्तव्यामुळे कामास प्राधान्य देणे गरजेचे असते, अशा वेळी कामाच्या अतिरिक्त तणावामुळे जेवणास उशीर झाला, तर जेवण संपल्याचे सांगण्यात येते. अनेकदा उपाशीच राहावे लागते, तर अनेकदा जे अाहे ते खावे लागते, अशा प्रतिक्रिया या वेळी अनेक प्रशिक्षणार्थींनी दिल्या.

वरिष्ठांनी तरी लक्ष देणे गरजेचे अाहे...
^सुप्रिया माळीकडे अखेरपर्यंत दुर्लक्षच केले गेले. ती अॅडमिट असताना तिच्याजवळ कोणी असते, तर कदाचित तिचे प्राण वाचलेही असते. अाता इतर प्रशिक्षणार्थींची तरी गैरसाेय टळावी अाणि त्यांची कुचंबना हाेऊ नये, यासाठी वरिष्ठांनीच जातीने लक्ष घालणे गरजेचे झाले अाहे.

प्रशिक्षणार्थींची अवहेलना कायम...
^गेल्या वर्षभरापासून आम्ही या जिल्हा शासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहतोय. या वसतिगृहामधील अनेक समस्या अाहेत. मुलींना बाहेर जाऊ दिले जात नाही. तसेच आजारी पडल्यावरही सुटीही मिळत नाही. जेवणाचीही गैरसाेयच अाहे. सगळीकडून अवहेलनाच हाेत अाहे. -प्रशिक्षणार्थी परिचारिका

अाश्वासनांची पूर्तता व्हावी...
^जेवणाची समस्या, सुटीची समस्या वार्डनची समस्या अशा अनेक समस्या गेल्या वर्षभरापासून जिल्हा शासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना भेडसावत अाहेत. या समस्या सोडविण्याची केवळ ग्वाहीच दिली जाते. अाता पुन्हा वरिष्ठांनी याबाबत अाश्वासन दिले अाहे. मात्र, ते पूर्ण कधी हाेणार याबाबत साशंकताच अाहे. - प्रशिक्षणार्थी विद्यार्थी

हे प्रकरणही संशयास्पद...
प्रशिक्षणार्थी सुप्रिया माळीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून तिच्या मृत्यूची दैनंदिन वहीत नोंद घेण्यात आली नाही. ती मृत झाल्यानंतर तिचे विच्छेदन होणे अपेक्षित असताना रुग्णालयाकडून त्याला फाटा दिल्याचे बाेलले जाते. पहाटेच्या सुमारास तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला हाेता. हा प्रकार संशयास्पद असल्याची तक्रारही प्रशिक्षणार्थींनी केली अाहे.

प्रशिक्षणार्थी गैरसमज असावा...
गेल्यादोन महिन्यांपासून जिल्हा शासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय वसतिगृहामधील एकाही प्रशिक्षणार्थीला सुट्या देण्यात अाल्या नाहीत. मात्र, त्यांनी शिक्षा म्हणून सुट्या दिल्या जात नसल्याचा गैरसमज करून घेतला असावा, अशी प्रतिक्रिया रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

अशा अाहेत समस्या...
निकृष्टदर्जाचे जेवण, तेही वेळेवर नाही, सुटीच्या दिवशी वसतिगृहाची साफसफाई करण्याची जबाबदारी, आजारी असल्यावर उपचारासाठी गेल्यास सुटी लावणे, वसतिगृहातील शौचालयांची मुलींकडूनच स्वच्छता करून घेणे, नातेवाईकांना तक्रार केल्यास परीक्षा, तसेच अहवालावर परिणाम हाेण्याची धमकी अशा अनेक समस्यांना अाजघडीला येथील प्रशिक्षणार्थींना सामाेरे जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या अाहेत.

फोन बंद, संपर्क कसा करायचा..?
जिल्हाशासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय वसतिगृहामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी फोन बसविण्यात अाले अाहेत. मात्र, अनेक महिन्यांपासून दाेन्ही ठिकाणचे फोन बंद करण्यात अाल्यामुळे वसतिगृहात राहणाऱ्या या प्रशिक्षणार्थींची गैरसाेय हाेते. विशेष म्हणजे, त्यांना मोबाइल वापरण्यास मनाई असून, माेबाइलवरून घरच्यांशी संपर्क साधल्यास वरिष्ठांकडून कारवाई केली जाते. मग या प्रशिक्षणार्थींनी पालकांशी संपर्क तरी कसा साधायचा, असा प्रश्न उपस्थित केला अाहे.
जिल्हा शासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय वसतिगृहातील असुविधांकडे दुर्लक्ष
कुंभमेळ्यात देशभरातून आलेल्या भाविकांच्या आरोग्यासाठी सलग ७२ तास कार्यरत परिचारिकांच्याच आरोग्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांना अावश्यक त्या सुविधा पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने अाता या परिचारिकांनाच अनाराेग्याची बाधा झाली अाहे. नुकत्याच झालेल्या प्रशिक्षणार्थीच्या मृत्यूच्या घटनेनंतर निकृष्ट आहार, उशीर झाल्यास जेवणच नाही, सुट्या बंद, वरिष्ठांकडून अपमानास्पद वागणूक, कुठल्याही कारणावरून नापास करण्याची धमकी अशा अनेक तक्रारींना येथील परिचारिकांनी वाचा फाेडली असून, या पार्श्वभूमीवर ‘डी.बी. स्टार’ने जिल्हा शासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय वसतिगृहात पाहणी केली असता, या प्रशिक्षणार्थींना वास्तवात अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागत असल्याचे दिसून अाले अाहे.
{वरिष्ठांच्या मनमानीमुळे गुदमरताेय प्रशिक्षणार्थींचा श्वास
{ विविध समस्यांकडे डाेळेझाक हाेत असल्याच्या अनेक तक्रारी
{ जिल्हा शासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय वसतिगृहामधील प्रशिक्षणार्थीची संख्या का घटली?
वसतिगृहातील प्रशिक्षणार्थीच्या संख्येत घट होण्याची कारणे तत्काळ जिल्हा शल्यचिकित्सकांकडून मागवून त्याबाबत चौकशी करणार.
{परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय वसतिगृहामध्ये मुलींना अनेक समस्यांना सामाेरे जावे लागत अाहे, त्या साेडवण्यासाठी काय पावले उचलणार?
महाराष्ट्रशासनाच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी-सुविधा प्रशिक्षणार्थींना प्राधान्याने मिळवून देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मी स्वत: जातीने लक्ष घालून प्रशिक्षणार्थींना सुविधा पुरविण्याचे प्रयत्न करणार अाहे.
{प्रशिक्षणार्थींना निकृष्ट जेवण मिळते, त्यातही त्यांच्याकडून जेवणाचे ५०० रुपये अतिरिक्त घेतले जातात. काय कारण?
शासनाकडून प्रशिक्षण महाविद्यालय वसतिगृहामधील प्रशिक्षणार्थीच्या एक महिन्यासाठीच्या जेवणासाठी केवळ १५०० रुपये अनुदान मिळते. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना चांगल्या दर्जाचे जेवण देण्यासाठी त्यांच्याकडून ५०० रुपये अतिरिक्त घेतले जातात.