आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकला गाभाऱ्यात फक्त एक तास प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशातीलबारा ज्याेतिर्लिंगांमधील एक तीर्थस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंिदराच्या देवस्थान न्यासातर्फे भाविकांना दर्शनासाठी गर्भगृहात दिवसभरात केवळ एक तासच प्रवेश देण्यात येणार अाहे. सकाळी ते या वेळेत साेवळे नेसूनच भाविकांना गाभाऱ्यात जाण्याची परवानगी देण्यात येईल. न्यासाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात अाला.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सविस्तर चर्चा करून या निर्णयावर शिक्कामाेर्तब करण्यात अाले. देवावर पंचामृत, गंध, अक्षता वाहण्याने प्राचीन शिवपिंडीची प्रचंड झीज हाेण्याची भीती असल्याने जास्त भाविकांना गर्भगृहात जाऊ देणे अयाेग्य असल्याचे मत पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले हाेते. तसेच, गर्भगृहात दिवसभर भाविकांनी जा-ये केल्यास रांगेत उभे राहून दर्शन करणाऱ्यांना नीट दर्शन हाेत नसल्यामुळे तसेच गाभाऱ्यात जागा अत्यंत कमी असल्यामुळे तेथे हाेणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात अाला असल्याचे देवस्थानच्या वतीने कळवण्यात अाले.

‘संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी’
गर्भगृहालाअात येण्यास जाण्यास एकच दरवाजा असून, खिडकी किंवा झराेेका नसल्याने गर्दीमुळे प्राणवायूच्या अभावाने दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी म्हणूनदेखील भाविकांना िदवसभर गाभाऱ्यात साेडण्याचा निर्णय घेण्यात अाल्याचे मंदिर प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...