आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Transport Association Will Chakkajam Agitation In October

ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा चक्काजाम ऑक्टोबरपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - टोलनाका आणि टीडीएस विरोधात ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशन आक्रमक झाली असून, ऑक्टोबरला चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष भीम वाधवा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अमृत मदन, नाशिकचे अध्यक्ष अमृतसिंग, फियाद खान आदी उपस्थित होते.

नाशिक-पुणे रोडवरील कृष्णा लॉन्स येथे रविवारी अध्यक्ष वाधवा यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनची बैठक झाली. यात ऑक्टोबरला देशभरात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. केंद्र सरकारने सत्तेत आल्यानंतर देशभरात टोल बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही वाहनांकडून टोल आकारणी सुरूच असून, अतिरिक्त टीडीएसदेखील आकारला जात असल्याचे वधावा यांनी या वेळी सांगितले.
याशिवाय, वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असल्याचा आरोपदेखील वधावा यांनी केला. याविरोधात देशभरातील असोसिएशनचे दहा लाख सभासद येत्या ऑक्टोबरला चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे वाधवा यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक येथे झालेल्या असोसिएशनच्या या बैठकीस महाराष्ट्रासह इंदूर, भोपाळ, रायपूर, अहमदाबाद, सुरत, दिल्लीमधील असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

या आहेत मागण्या
>सरसकट टोल माफी करावी
>टीडीएस आकारणी बंद करावी
>वाहतूक पोलिसांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी