आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीआे’त चार हजार प्रकरणे सात दिवसांत एजंटविना मार्गी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-परिवहन आयुक्तांनी परिवहन कार्यालयात एजंट अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर केवळ सात दिवसांत एजंटविना चार हजार प्रकरणे कार्यालयात आले आहेत. तसेच आतापर्यंत ३७ लाख रुपयांचा महसूल कार्यालयाला प्राप्त झाल्याची माहिती ‘आरटीआे’ कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

राज्याचे परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या १२ जानेवारीच्या पत्रानुसार राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कार्यालयात एजंट आणि अनधिकृत व्यक्तींना प्रवेश देण्याचे सूचित केले होते. काही दिवसांपासून अंमलबजावणी सुरू होती. एजंट आणि ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी नियमित कामे करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शनिवार(दि. १७)पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. शासकीय सुट्या वगळता सात दिवस या आदेशाच्या अंमलबजावणीला झाले असून, या सात दिवसांत ४०८४ प्रकरणे एजंटविना करण्यात आली आहेत. या प्रकरणातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला ३७ लाख ७३ हजार २८९ रुपये महसूल प्राप्त झाला आहे. तसेच कार्यालयाचे कोणतेही फाॅर्म किंवा अर्ज आता ऑनलाइन www.mahatranscom.in या संकेतस्थळावरून मिळणार आहे. तसेच शिकाऊ अनुज्ञप्ती पक्क्या अनुज्ञप्तीसाठी www.sarathi.nic.in वर पूर्वनियाेजित वेळ घेऊन अर्ज करावा, असे आवाहन केले अाहे.