आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील वाहतूक मार्गात उद्या बदल, गणेश विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीसाठी गुरूवारी (दि. १५) नाशिक शहरात नाशिकरोड, गंगापूर, नांदुरनाका येथे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला अाहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
श्रीगणेश विसर्जन मिरवणूक गुरुवारी दुपारी वाकडी बारव, चौकमंडई, जहांगीर मशिद, दादासाहेब फाळके मार्ग, महात्मा फुले मार्केट, बादशाह लॉज कॉर्नर, विजयानंद थिएटर, गाडगे महाराज पुतळा, गो. ह. देशपांडे पथ, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, जुना आग्रारोड, अशोकस्तंभ, नवीन तांबट अाळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, परशुराम पुरिया रोडने कपालेश्वर मंदिर, भाजी बाजार, म्हसोबा पटांगण अशी जाऊन मूर्तींचे गाेदावरीत विसर्जन करण्यात येणार आहे. या मार्गावर दुपारी १२ पासून मिरवणुकीत सहभागी वाहने वगळता सर्व वाहनांसाठी मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंदी राहणार आहे.

नाशिकरोड येथे विसर्जन मिरवणूक बिटको चौक, पूनारोड, शिवाजी महाराज पुतळा, देवी चौक, रेल्वे स्थानक पोलिस चौकी, सुभाषरोड, सत्कार पॉइंट, देवळाली गाव, गांधीपुतळा, खोडदे किराणा, दुकान, ते वालदेवी नदी देवळालीगाव हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील. या मार्गावरील इतर वाहने दत्तमंदिर सिग्नलपर्यंत जातील तेथून परत येतील. सिन्नरकडे जाणाऱ्या बस इतर वाहने उड्डाणपुलावरून जातील.नांदूरनाका ते सैलानीबाबा चौक सैलानी बाबा चौक ते नांदूरनाका हा मिरवणूक मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. येथील वाहन नाशिकरोड विभागातील नांदूरनाका ते सैलानीबाबा चौक, मार्गाने जाणारे वाहने नांदूरनाका औरंगाबादरोडने तपोवनातील जनार्दनस्वामी पूलमार्गे जा-ये करतील.

मिरवणूक मार्गाची तपासणी
गणेशविसर्जन मिरवणूक मार्गाची बीडीडीएस पथकाकडून सकाळी, दुपारी तपासणी करण्यात येणार आहे. यासह राज्य गुप्त वार्ता विभाग, विशेष शाखेचे अधिकारी, कर्मचारी, बंदोबस्तात सहभागी राहणार आहे. श्वान पथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी करण्यात येणार आहे.
गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. १५) दुपारी विसर्जन मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या नियाेजनानुसार शहरात पोलीस उपआयुक्त, पाच सहायक आयुक्तांसह २८ भद्रकाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अतिरिक्त २८ पोलीस निरिक्षक, ६४ उपनिरिक्षक, ८८९ कर्मचारी, ७३ महिला कर्मचारी, होमगार्ड, शीग्रकृती दल तुकडी, एसआरपीएफ च्या तुकड्या आणि रँपीड अँक्शन फोर्सची एक तुकडी बंदाेबस्तासाठी या काळात तैनात राहणार आहे.

हा आहे पर्यायी मार्ग
मिरवणूक कालावधीत पंचवटी एसटी बस डेपो क्रमांक २, निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या सर्व बस पंचवटी डेपोतून सुटतील. तर ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बस इतर प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, शहरात इतरत्र जातील. पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल कन्नमवार पुलावरून जातील. रविवार कारंजा अशोक स्तंभ येथून सुटणाऱ्या बस शालिमार येथून सोडण्यात येतील.
बातम्या आणखी आहेत...