आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यानिमित्त २० सप्टेंबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळ्यानिमित्त लाखाे भाविक, पर्यटक नाशिकमध्ये दाखल हाेणार अाहेत. यामुळे वाहतूक काेंडी हाेऊ नये या उद्देशाने साधुग्रामकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत मंगळवार(दि. ४)पासून ते २० सप्टेंबरपर्यंत माेठ्या प्रमाणात बदल करण्यात अाले अाल्याची माहती पाेलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. या सर्व मार्गांवर पाेलिस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दल साधू-महंतांची वाहने यांची वाहतूक सुरू राहणार अाहे.
वाहतुकीसाठी हे रस्ते बंद
स्वामिनारायणपाेलिस चाैकी ते निलगिरी बाग (अाैरंगाबादराेड) कडे
तपाेवन क्राॅसिंग ते तपाेवन
लक्ष्मीनारायण पूल ते तपाेवन
नाशिक तट डावा कालवा ते स्वामिनारायण चाैक साधुग्रामकडे
पंचवटी काॅलेज ते तपाेवन साधुग्रामकडे
कन्नमवार पुलाखालून ते साधुग्राम
नवीन टाकळी घाट संगम पूल ते नाशिक तट डावा कालवा

या मार्गांचा व्हावा अवलंब
के.के. वाघ काॅलेज ते स्वामिनारायण चाैकीपर्यंत सर्व्हिसराेड अाग्रा हायवेवरील वाहतूक ही उड्डाणपुलावरून उड्डाणपुलाखालून अाग्राराेडने इतरत्र वळविण्यात अाली अाहे. मुंबई-नाशिकहून अाैरंगाबादकडे जाणारी वाहने अमृतधाममधून पुढे तर टाकळी गावातील धुळे-मुंबईसाठी येणारी वाहने टाकळी फाटामार्गे इतरत्र अाैरंगाबादकडून येणारी वाहतूक ही निलगिरीबाग येथून उजव्या बाजूस वळून रासबिहारी चाैक बी. डी. कामगारनगरमार्गे धुळे, मुंबईसाठी रवाना हाेईल. तर अाैरंगाबादकडून पुणे, नाशिकसाठी येणारी वाहतूक ही नांदूरनाका येथून डाव्या बाजूस वळून जेलराेडमार्गे इतरत्र जाईल.