आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरामुक्‍तीसाठी 'एसएमएस' या फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कचरामुक्त नाशिकसाठी महापालिकेतर्फे शनिवारपासून ‘एसएमएस’ योजना राबविण्यात येणार आहे. ज्या भागात कचरा साचलेला दिसेल त्या भागाचा पत्ता संबंधितांनी 9423179097 किंवा 9423179087 या क्रमांकांवर ‘एसएमएस’द्वारे पाठवावा, असे आवाहन महापौर अँड. यतिन वाघ यांनी केले आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सात प्रभागांमध्ये राबविण्यात येणार आहे.

याविषयी माहिती देताना महापौर पत्रकार परिषदेत म्हणाले, की स्वच्छ व सुंदर नाशिक ही संकल्पना प्रत्यक्षात कागदावर उतरविण्यासाठी ‘एसएमएस’ची योजना राबविण्यात येत आहे. यात कचरा, झाडपाला, बांधकामाचे साहित्य (डेब्रिज) पडलेले असेल त्या ठिकाणचा संपूर्ण पत्ता मोबाईल ‘एसएमएस’द्वारे उपरोक्त क्रमांकांवर पाठवावा.

आठ दिवसांनंतर दंड
ही प्रायोगिक तत्त्वावरील योजना सुरू झाल्यापासून आठ दिवसांचा कालावधी हा जनजागृतीचा राहणार आहे. या कालावधीत निर्धारित केलेल्या विविध प्रभागांमध्ये कचरा टाकणार्‍यांना समज देण्यात येणार आहे. त्याबरोबरच अश नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकण्याचे दुष्परिणामदेखील समजावून सांगण्यात येणार आहेत. परंतु, आठवडाभरानंतर अशी तक्रार पुराव्यासह कोणी सादर केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

नगरसेवकांनीही दक्ष राहावे
‘कचरामुक्त नाशिकसाठी महापालिकेने राबविलेली ‘एसएमएस’ योजना स्तुत्य आहे. परंतु, आपल्या प्रभागात कचरा होणार नाही याची दक्षता संबंधित प्रभागातील नगरसेवकानेही घेणे आवश्यक आहे. नगरसेवक जागरूक असतील तर रस्त्यावर कचरा कोणी टाकू शकणार नाही. वसंत गिते, आमदार

कचरामुक्तीसाठी आता ‘एसएमएस’चा फंडा
ज्या ठिकाणी नेहमीच कचरा टाकला जातो त्या ‘ब्लॅकस्पॉट’ची सचित्र माहिती ‘दिव्य मराठी’कडून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध केली जात आहे. हे ब्लॅकस्पॉट मिटविण्यासाठी उपाययोजना सुचविताना महापौरांनी हेल्पलाइन सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार महापौरांनी शनिवारी ‘एसएमएस’ योजनेची घोषणा केली आहे.