आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीचा भाडेकपातीचा प्रस्ताव, डिझेलच्या भावाच्या तुलनेत भाडे आकारण्याचा विचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव- डिझेलचे दर पाच महिन्यांत लिटरमागे 10 रुपयांनी कमी झाले. मात्र, एसटी महामंडळाने प्रवासभाड्यात बदल केला नसल्याने प्रवाशांकडून ओरड होत होती. त्याची दखल घेत एसटीने भाडेकपातीचा प्रस्ताव परिवहन मंत्रालयाकडे पाठवला असून त्यावर या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लवकरच भाडे कमी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
मागील पाच महिन्यांत 8 वेळा पेट्रोलचे भाव कमी झाले. पेट्रोल लिटरमागे ८ रुपये ७२ पैशांनी, तर डिझेल १० रुपयांनी कमी झाले. त्यामुळे एसटीचे भाडे कमी करण्याचा प्रस्ताव मंडळाने मंत्रिमंडळाकडे पाठवला आहे.

तुलनेत १३ टक्के कर जास्त : इतर राज्य परिवहन महामंडळांना त्यांच्या शासनाला ३ ते ४ टक्के कर द्यावा लागतो. महाराष्ट्रात तो १७ टक्के आहे. त्यामुळे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील एसटीचे प्रवास भाडे १८ टक्के जास्त आहे.

प्रस्ताव मिळाला नाही : याबाबत परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र भाडेकपातीचा प्रस्ताव मिळाला नसल्याचे सांगितले.

प्रस्ताव पाठवला
डिझेल स्वस्त झाल्याने आम्ही प्रवास भाडेही कमी करण्याचा प्रस्ताव गत आठवड्यात मंत्र्यालयाकडे पाठवला आहे.
- विनोद रत्नपारखी, एम.डी., एसटी