आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tree Authority Committee Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृक्ष प्राधिकरणास मिळेना मोफत तज्ज्ञ सदस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या कारभारात सुसूत्रता येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित होणाऱ्या तज्ज्ञ समिती सदस्यपदासाठी केवळ दोन अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी मानधन वा वेतनाची तरतूद नसल्यामुळे मोफत सल्ला देण्याची वेळ तज्ज्ञांवर आली आहे. त्याहून मोठी बाब म्हणजे, तज्ज्ञ समिती सदस्य निवडीसाठी मोठ्या संस्थेतील मोठ्या पदावरील तज्ञांची नियुक्ती केली असून, त्यांच्यावरही किती अर्ज येतात हे बघण्याची वेळ आली आहे.
पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला घरघर लागली असून, सद्यस्थितीत प्राधिकरणाच्या अधिकार व कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी काय करता येईल, याची चाचपणी करण्यात येत आहे. त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण, कृषी, बॉटनिकल, सामाजिक वनीकरण अशा विविध क्षेत्रातील सहा सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी केवळ दोनच अर्ज आले असून, त्यातील एक अर्ज औरंगाबाद येथील महिलेचा आहे. या महिलेला येण्या-जाण्यासाठी लागणारा खर्चही देण्याची तरतूद जाहिरातीत करण्यात आलेली नाही. किमान वा कमाल वेतन, मानधन असे कोणतेही स्पष्ट आदेश नसल्यामुळे मोफतचा सल्ला देण्यासाठी कोणीही तयार नसल्याचे म्हणणे आहे. दरम्यान, या तज्ज्ञांची िनवड करण्यासाठी मेरी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रमुख तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहा पदांसाठी केवळ दोन अर्ज असल्यामुळे त्यांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्यांना नगरसेवकांसमानच दर्जा आहे. सात सदस्यांची निवड करायची असून, त्यासाठी आठ अर्ज पालिकेला प्राप्त झाले आहेत. या अर्जात सत्ताधारी मनसेशी संबंिधत अर्जदारांचाही समावेश आहे.