आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरवाईसाठी वृक्षसंवर्धनाचा वसा, सतीश नलावडे यांनी 32 वृक्षांचे घेतलेय पालकत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- झाडे लावा, झाडे जगवाच्या घोषणा केवळ घोषणाच ठरत असताना राणेनगर येथील एका मुलूखावेगळ्या माणसाने सतीश नलावडे यांनी 32 वृक्षांचे पालकत्व घेतलेय .

हिरवाईसाठी वृक्षसंवर्धनाचा
वसा घेतला आहे. येथील सतीश नलावडे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. पण, केवळ नोकरी आणि घर असे न करता ते मिळेल तेवढा वेळ वृक्षसंवर्धनासाठी देत आहेत.

पर्यावरण संवर्धनासाठी अनेकदा वृक्षारोपण केले जाते. मात्र, नंतर वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते. अशाच झाडांना नलावडे जणू दत्तकच घेतात. नलावडे यांनी परिसरातील 32 वृक्षांचे संवर्धन सुरू केले आहे. त्यात वड, पिंपळ, कडुनिंब, पळस, कांचन, कदंब, उंबर, आंबा, आदी वृक्षसंपदेचा समावेश आहे. सकाळी व सायंकाळी ते झाडांना पाणी देतात. त्यासाठी त्यांनी विशेष व्यवस्था केलेली आहे. ठिकठिकाणी पाण्याच्या बाटल्या ठेवून त्याद्वारे ते पाणी देतात. एका झाडाला दररोज दोन लिटर पाणी दिले जाते. त्यामुळे परिसरातील वृक्षराजी बहरताना दिसून येत आहे. त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या सान्निध्यात येणारे अनेक जणदेखील वृक्षसंवर्धनाचा वसा घेताना दिसत आहेत.

लोकसहभाग वाढावा
वृक्षसंवर्धनाच्या उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त होणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम झाल्यास खर्‍या अर्थाने त्याचे संवर्धन होईल, अशी भावना नलावडे यांनी व्यक्त केली.