आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होेळीसाठी दिलाजातोय वृक्षांचाबळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वृक्षांचे घनदाट जंगल असलेल्या शहराचे स्वरूप आजघडीला काँक्रिटीकरणाचे जंगल असेच काहीसे झाले आहे. शहराच्या वाढत्या व्याप्तीमुळे सर्रासपणे वृक्षतोड केली जात असून, यामुळे पर्यावरणाला मात्र माेठ्या प्रमाणावर धोका पोहाेचत अाहे.
प्रत्यक्षात अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कारवाईचे अादेश उच्च न्यायालयाने िदले अाहेत. महाराष्ट्र वृक्ष संरक्षण संवर्धन अधिनियम, १९७५ च्या तरतुदीनुसार पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास बंदी घालण्यात अाली आहे. अवैधरीत्या वृक्षतोड केल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी १००० ते ५००० रुपये दंड, तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत तुरुंंगवासाची शिक्षा होऊ शकते. अशी कायद्याची तरतूद असतानाही प्रशासनाकडून हाेणाऱ्या दुर्लक्षामुळे अनेक नागरिकांकडून सर्रासपणे स्वार्थासाठी वृक्षांची कत्तल करण्याचे धारिष्ट्य केले जात अाहे. ताेंडावर येऊन ठेपलेल्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर जाळण्यासाठी लाकूड हवे म्हणून ठिकठिकाणी सर्रासपणे वृक्षतोड केली जात असल्याच्या तक्रारी हाेत्या. या पार्श्वभूमीवर ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने शहरात िवविध ठिकाणी पाहणी केली असता, वृक्षांचा बळी दिला जात असल्याच्या तक्रारींत सत्यता अाढळली. सर्रासपणे होणाऱ्या या वृक्षतोडीविरोधात महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती, उद्यान विभागाला थेट कारवाई करण्याचे अधिकार असतानाही त्यांच्याकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने दरवर्षी होळीला वृ़क्षांची कत्तल हाेत असते. विशेष म्हणजे, एकीकडे महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी तसेच विविध वन विभागाद्वारे वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न केले जात असताना, दुसरीकडे मात्र शहरात अनधिकृतपणे होणाऱ्या या वृक्षतोडीकडे हाेणारे दुर्लक्ष पर्यावरणाला अत्यंत मारक ठरणारे अाहेत. यंदा तरी होळीनिमित्त वृक्षतोडीचे प्रमाण कमी होण्यासाठी वा त्याबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन व्हावे, यासाठी प्रशासनातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी ‘डी. बी. स्टार’कडे बाेलून दाखवले.

वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीचा उपयोग नाही
महापालिका प्रशासनाकडून वृक्ष प्राधिकरण समितीची नेमणूक करण्यात आलेली अाहे. मात्र, या समितीच्या बैठकीला आयुक्तच उपस्थित राहत नसल्याने बैठकीचा काही एक उपयोग होत नसल्याचे खुद्द समितीतील सदस्यांकडूनच सांगितले जात अाहे. यामुळे ही समितीदेखील नावालाच असल्याचे बाेलले जाते. परिणामी, शहरातील वृक्षताेड राेखणे कितपत शक्य हाेईल, याविषयी साशंकताच अाहे.

शहरात वर्षांपासून वृक्षगणनाच नाही
महापालिका प्रशासनाद्वारे शहरातील वृक्षगणना २००७ मध्ये करण्यात आलेली होती. त्यानंतर अद्यापपर्यंत तब्ब्ल वर्षांच्या कालावधीनंतरही अद्याप वृक्षगणना करण्यात आलेली नाही. याबाबत उच्च न्यायालयानेदेखील प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर उद्यान विभागातर्फे वृक्षगणनेस सुरुवात केल्याची माहिती उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीशी बाेलताना दिली.

..तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल हाेणार
शहरात कोणत्याही ठिकाणी कोणाच्याही परवानगीशिवाय वृक्षतोड केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ शकते. तसेच, संबंधितावर महापालिका प्रशासनाच्या उद्यान विभागाद्वारे थेट पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात येतो. असे असतानाही होळी वा अन्य कारणांसाठी शहरात ठिकठिकाणी वृक्षतोड हाेत असल्याने उद्यान विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

प्रदूषणात भर आणि पर्यावरणालाही धोका
होळीत अनेक ठिकाणी गोवऱ्या, लाकडे जाळली जातात. या प्रकारामुळे प्रदूषणातही भर पडते. परिणामी, पर्यावरणालाही धोका पाेहोचतो. धार्मिक महत्त्व असल्याने याबाबतही नागरिकांमध्ये प्रबोधन होण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध मंडळांनी एकत्र येऊन सार्वजनिकरीत्या एकाच ठिकाणी होळी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज अाहे.

या ठिकाणी केली जातेय वृक्षतोड
शहरातील तपोवनरोड, मेरी, म्हसरूळ परिसर, सातपूर, अंबड, पाथर्डी फाटा, मखमलाबाद, नाशिकराेड, सिडकाे परिसरात अनेक मोठी वृक्ष आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर यातील अनेक ठिकाणी वृक्षांची सर्रासपणे कत्तल केली जात असल्याच्या तक्रारी वाढत अाहेत. या वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी त्यांना याेग्य संरक्षण देणे गरजेचे बनले अाहे. प्रशासनाने या वृक्षांच्या संरक्षणासाठी वेळीच पावले उचलायला हवीत, जेणेकरून पर्यावरणाचे संतुलन राखणे शक्य हाेईल.

^वृक्षतोड राेखण्यासाठीतसेच शहरातील वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने वृक्ष प्राधिकरण समितीने याेग्य उपाययाेजना करणे गरजेचे बनले अाहे. समाजसेवी संस्था, सार्वजनिक मंडळांनीही याकामी प्रबोधन करणे गरजेचे आहे. - कैलास देशमुख

^शहरात अवैधरीत्याहोणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. शहरातील ही वृक्षतोड रोखण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पुढाकार घेत पर्यावरणाला हानी पाेहाेचवणाऱ्यांविराेधात कठाेर कारवाई करणे गरजेचे अाहे. - जितेंद्र बच्छाव, पर्यावरणप्रेमी

अधिकाऱ्यांनी थेट कारवाई करणे अपेक्षित...
^शहरात कोणीहीअनधिकृतपणे वृक्षतोड करत असल्यास त्या विरोधात अधिकाऱ्यांनी थेट कारवाई करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची गरज आहे.- संजय साबळे, नगरसेवकतथा सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती
..तर दंडात्मक कारवाई करू
होेळीसाठी दिलाजातोय वृक्षांचाबळी
दिवसेंदिवस पर्यावरणाचे ढासळणारे संतुलन पाहता अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे झाले अाहे. होळीच्या पार्श्वभूमीवर वृक्ष तोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करीत थेट तुरुंगात टाकण्याचीही तरतूद असताना, प्रत्यक्षात मात्र शहरात सर्रासपणे हाेणाऱ्या वृक्षताेडीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्षच हाेत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत िदसून येत अाहे. प्रशासनाकडून या कामी िवशेष पथकेदेखील नेमण्यात अाली असताना, त्यांच्याकडून कारवाई हाेत नसल्याने हाेळीसाठी वृक्षांची कत्तल केली जात अाहे. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या या प्रकारावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझाेत...
पी. पी. फाल्गुने, उपनिरीक्षक, उद्यान विभाग
थेट प्रश्न
{शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतरीत्या वृक्ष तोडले जात आहेत, त्यावर काय कारवाई करण्यात येणार?
-शहरात कोणत्याही ठिकाणी अनधिकृतपणे वृक्ष तोडले जात असल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. तसेच, त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात येऊ शकतो.

{उद्यानविभागाकडून वृक्षतोड रोखण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत?
-सर्व ठिकाणी पोहाेचणे अधिकारी कर्मचाऱ्यांना शक्य नाही. याबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे.

{शहरातिकती वर्षांपासून वृक्ष गणना करण्यात आलेली नाही?
-शहरातील वृक्षगणना २००७ मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर वृक्षगणना झालेली नाही. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर वृक्षगणना करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...