आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

५८ वृक्ष ताेडल्याप्रकरणी ‘हिरवा वणवा’चे सदस्य दातारांवर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका क्षेत्रात वृक्षताेडीला बंदी असताना गंगापूरराेडवर एका फार्महाऊसमधील ५८ वृक्ष ताेडल्याबद्दल महापालिकेच्या उद्यान विभागाने संबंधित मालकाविराेधात गुन्हा दाखल केला अाहे. ३० सप्टेंबर राेजी हा प्रकार घडला असून, या प्रकरणी सोमवारी (िद. ३) गंगापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण जतन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रात वृक्षताेडीवर निर्बंध असून, शहरातील अनेक रस्त्यांवरील धाेकेदायक वृक्ष केवळ याच बंदीमुळे हटवली जात नव्हती. मात्र, नवीन वृक्ष लागवड, ताेडलेल्या वृक्षांचे पुनर्राेपण, एकास पाच वृक्ष लावण्यासारखे पर्याय याेजून अाता काेठे काही वृक्ष हटवण्यात अाले. दरम्यान, काॅलनी रस्ते, खासगी जागेवरील वृक्षांबाबत अद्यापही वृक्ष प्राधिकरण समितीकडे प्रकरणे भिजत पडून अाहेत. दरम्यान, गंगापूरराेडवर ‘दातार फार्म’ येथे गुलमाेहर सुरू प्रजातीची ५८ वृक्ष ताेडल्याची तक्रार महापालिकेच्या उद्यान विभागाचे निरीक्षक रमेश गायकवाड यांनी गंगापूर पाेलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात अाला असून, मिळकतीचे मालक भालचंद्र दातार यांच्याविराेधात महाराष्ट्र नागरिक क्षेत्र वृक्षांचे संरक्षण जतन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अधिनियमात नागरी क्षेत्रातील वृक्षांचे संरक्षण जतन करण्याबाबत नियम असून, त्याचा भंग झाल्यास या अधिनियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेच्या उद्यान विभागाला देण्यात अाले अाहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात अाली अाहे.

नाशिक-मुंबई महामार्गासाठी अनेक पुरातन पर्यावरणाच्यादृष्टीने महत्त्वाचे वृक्ष ताेडले जात असल्यामुळे त्याविराेधात ‘हिरवा वणवा’ या सामाजिक संस्थेने काही वर्षांपूर्वी जाेरदार माेहीम घेतली हाेती. या माेहिमेत राजन दातार यांनी प्रमुख भूमिका बजावली हाेती. महामार्गाच्या कामासाठी वृक्ष ताेडले जात असल्याने त्यावेळी पर्यावरणपूरक भूमिका घेणाऱ्या दातार यांच्याच फार्महाऊसमध्ये ५८ वृक्षांची ताेड झाल्याचे वृत्त अाल्यामुळे शहरात तसेच पर्यावरणप्रेमींमध्ये चांगलीच खळबळ उडाली अाहे. दरम्यान, याबाबत दातार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काेणतीही प्रतिक्रिया व्यक्त करता न्यायालयात याेग्य ती बाजू मांडली जाईल, असे याबाबत स्पष्ट केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...