आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tree Cutting On Pandavleni Surrounding Issue At Nashik

पांडवलेणीच्या सौंदर्यावर बसतोय वृक्षतोडीचा घाव, अवैध वृक्षतोड सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - "झाडेलावा, झाडे जगवा'चा जागर करून पर्यावरण संवर्धन रक्षणासाठी शासकीय स्तरापासून ते सामाजिक संघटनांपर्यंत व्यापक प्रमाणात प्रयत्न होत असले तरी, दुसरीकडे अवैध वृक्षतोडही बेसुमार सुरू आहे. नसिर्गसंपन्नतेने बहरलेल्या पांडवलेणी डोंगर परसिरात काही दिवसांपासून सर्रास वृक्षतोड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकाराबाबत काही जागरूक नागरिकांनी तक्रारी करूनही वनविभागाने अद्याप काहीही कारवाई केली नसल्याने, डोंगरावरील वनसंपदा धोक्यात आली आहे.

पाथर्डी परसिरातील पांडवलेणीच्या डोंगरावर मागील तीन-चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. डोंगराच्या चोहोबाजू घनदाट वनसंपदेने बहरल्या आहेत तर पायथ्याशी असलेल्या जवाहरलाल नेहरू वनोद्यानातही दुर्मिळ वनस्पतींची लागवड संवर्धन करण्यात आले आहे. नेहरू उद्यान आणि घनदाट वृक्षांमुळे डोंगराचे सौंदर्य बहरले असल्याने हा परसिर पर्यावरणप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. नसिर्गाच्या सािन्नध्यातील या परसिरात जॉगिंग करण्यासाठी रोज सकाळी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. जॉगिंग करताना काही जागरूक नागरिकांच्या नदि.र्शनास वृक्षतोडीचा प्रकार आला आहे. साधारण आठवडाभरापासून या डोंगरावरून घनदाट वृक्षांची तोड होत आहे. दुपारच्या सुमारास काही मजूर ही वृक्षतोड करीत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. तर, रात्रीच्या वेळेस तोडलेल्या झाडांची वाहतूक केली जाते. अवैध वृक्षतोडीबाबत तक्रारी करूनही वनविभागाने त्याची दखल घेतल्याने वनसंपदा धोक्यात आली आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉ. प्रवीण गोसावी, डॉ. िवक्रम पाटोळे या पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
नसिर्गप्रेमींसह भाविक पर्यटकांचे आकर्षण बनलेल्या पांडवलेणी परसिरात अशी वृक्षतोड सुरू आहे.

पर्यावरणाचे रक्षण व्हावे
घनदाटवृक्षराजीमुळे पांडवलेणीचे सौंदर्य खुणावू लागले आहे. वृक्षलागवडीचा उद्देश सफल झाला असून, आता संरक्षणाची गरज आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. - डॉ.सर्जेराव फटांगरे, रहिवासी,पाथर्डी फाटा

गस्त वाढविण्यात येईल
नेहरूवनोद्यान बंदिस्त असून, त्या ठिकाणी संरक्षणासाठी वनपाल रक्षकांची नेमणूक केली आहे. वृक्षतोड होत असल्यास गस्त वाढवून कारवाई करण्यात येईल. राजनगायकवाड, वनपरिक्षेत्र,अधिकारी

उद्यानातील दुर्मिळ वनस्पती धोक्यात
पांडवलेणीच्यापाठीमागे पायथ्याशी असलेल्या दुर्मिळ वनस्पतींच्या नेहरू वनोद्यानात मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी पर्यटक येत असतात. दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनाचे काम केले जात आहे. परंतु, दुसरीकडे डोंगरावरील चंदनाच्या झाडांसह इतर दुर्मिळ वृक्षांची तोड करून विक्री केली जात असल्याचा संशय स्थानिक रहि‌वाशांनी व्यक्त केला आहे.