आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन गावठी कट्टय़ांसह दहा काडतुसे जप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गावठा कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची कसून चौकशी केली असता आणखी तीन पिस्तुलांसह दहा जिवंत काडतुसेदेखील हस्तगत करण्यात आली.
निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाच्या युनिट क्रमांक तीनने महेश आंधळे या संशयितास सुरुवातीला अटक केली होती. त्यापाठोपाठ आणखी दोघांना अटक केली असता राहुल संदीप सोनवणे याचे नाव निष्पन्न झाले. सोनवणे यास अटक करून त्याची सखोल चौकशी केली असता त्याने वर्षभरापूर्वी देशी बनावटीचे दोन कट्टे आणि पाच जिवंत काडतुसे इम्रान युसूफ शेख (रा. फाळके रोड) यास विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी शेख यास ताब्यात घेत त्याच्या घराची झडती घेतली असता कट्टे व काडतुसे आढळून आली. त्याचबरेबर आणखी एका संशयितांकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमनाथ सातपुते, प्रेमचंद गांगुर्डे, जाकीर शेख आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली.