आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनव उपक्रम: झाड २० फूट वाढविल्यास, विद्यार्थ्याला लाखाचे इनाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वृक्षारोपणाच्या मोहिमा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतात, परंतु अपवाद वगळता काही ठिकाणीच ही झाडे जगलेली दिसून येतात. तथापि, नाशिकमध्ये आता हे चित्र बदलणार आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात एक वृक्ष लावून तो किमान दहा ते वीस फुटांपर्यंत वाढविल्यास प्रत्येक शाळेतील एका विद्यार्थ्याला तब्बल एक लाखाचे बक्षीस मिळणार आहे. तसेच ज्या शाळा दहा वर्षांत आपल्या आवारात विद्यार्थ्यांनी लावलेले ८५ टक्के वृक्ष किमान १० ते २० फुटांपर्यंत वाढवतील, त्याही बक्षिसास पात्र ठरतील. सर्वाधिक झाडे जगवणाऱ्या शाळांना प्रथम २५ लाख, द्वितीय १० लाख, तर तृतीय क्रमांकाचे ५ लाख रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात येणार अाहेत.

पर्यावरणप्रेमी व बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांनी ही अभिनव याेजना अाखली असून त्याद्वारे नाशिकमध्ये दीड लाख झाडे लावण्याचे नियेाजन अाहे. विद्यार्थ्यांना झाडे, वृक्षाराेपणासाठी खड्डा खाेदणे, माती व खत माेफत दिले जाणार अाहे. विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीपर्यंत राेपण केलेल्या झाडाची निगा राखावी लागणार आहे. याेजनेत सहभागी शाळांची नाेंदणी करून शाळेशी दैनंदिन संपर्क साधला जाणार अाहे. याेजनेच्या अखेरीस पर्यावरणतज्ज्ञांच्या समितीकडून पुरस्कारार्थीची निवड केली जाईल.
योजनेसाठी एक कोटीची ठेव
कडुनिंब, वड, पिंपळ, अांबा, संजपाणी, चैटी, कांचन असे सावली देणारे व पर्यावरणाच्या संतुलनासाठी पूरक वृक्ष रोपणासाठी दिले जातील. एका राेपासाठी कमीत कमी पाच रुपये, खाेदकाम, माती व खत असा पंधरा रुपये याप्रमाणे २० रुपये खर्च व त्यानंतर पुरस्काराच्या रकमेसाठीची जवळपास एक काेटीपर्यंतची रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत सुरक्षित ठेव म्हणून ठेवण्यात अाली अाहे.

पाच गुणांच्या तरतुदीची मागणी
उपक्रमाची माहिती उच्च शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांना देण्यात येणार आहे. तसेच अभ्यासक्रमात पर्यावरणासाठी किमान पाच गुण देण्याची मागणी करण्यात येणार अाहे. गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी पर्यावरणाकडे अाकर्षित हाेऊन त्याची काळजी घेतील, हा यामागचा उद्देश असल्याचे चंदे यांनी सांगितले.

इच्छुकांनी साधावा संपर्क
याेजनेच्या कामकाजासाठी शाळा, विद्यार्थी, सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमींसाठी नाशिक-पुणे महामार्गावरील शिखरेवाडी येथील स्टार झाेन काॅम्प्लेक्समध्ये दाेन अाठवड्यांत कार्यालय सुरू करण्यात येणार अाहे. कार्यालयातून इच्छुकांना उपक्रमाची माहिती दिली जाईल. अधिक माहितीसाठी ९३२५९९०७४० या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

स्वातंत्र्यदिनी हाेणार शुभारंभ
‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशी ही याेजना असून ितची सुरुवात १५ अाॅगस्ट राेजी होईल. तत्पूर्वी शहरातील सर्व शाळांची स्वयंसेवकांमार्फत नाेंदणी केली जाईल. त्यानंतर शाळांशी नियमित संपर्क साधला जाईल.
लाखाे झाडांची हाेणार लागवड
बालवयातच विद्यार्थ्यांत पर्यावरणाची अावड निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम हाती घेतला अाहे. वृक्षाराेपणासाठी अावश्यक मदत व पुरस्कार मिळवण्यासाठी विद्यार्थी झाडाच्या वाढीसाठी परिश्रम घेऊन शाळाही शंभर टक्के झाडे जगवण्याचा प्रयत्न करतील. स्पर्धेमुळे दीड लाख वृक्षांची लागवड हाेईल.
- दीपक चंदे, पर्यावरणप्रेमी
बातम्या आणखी आहेत...