आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षाराेपणासह संवर्धनासाठी विविध संस्था, संघटना कार्यरत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील हिरवाई टिकून राहण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने माेठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असून, त्यात वृक्षाराेपण अाणि वृक्षसंवर्धनाला महत्त्व देण्यात येत अाहे. या संस्थांनी अाजवर हजाराे झाडे लावून ती वाढविली अाहेत.
वृक्षाराेपणाविषयी केवळ भाषणबाजी करता पर्यावरणवादी संस्था गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विविध उपक्रम राबवित अाहेत. त्याचाच परिपाक म्हणून शहरातील पर्यावरणीय चळवळीला भरघाेस प्रतिसाद लाभत अाहे. शालेय विद्यार्थ्यांपासून वयाेवृद्धांपर्यंत सर्वच या उपक्रमात हिरिरीने सहभागी हाेतात, हे विशेष.

वृक्षाराेपणातसाेशल नेटवर्किंग फाेरमची अाघाडी
म्हसरूळच्या चामरलेणीच्या पायथ्याशी महापालिकेने दिलेल्या सहा एकर जागेत साेशल नेटवर्किंग फाेरमच्या माध्यमातून वनाैषधी नक्षत्रवन विकसित केले जात अाहे. या उद्यानात वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच यापासून तर हिरडा, बेहडा, अडुळसा, अावळा, बेल अादी प्रकारच्या २५०० राेपांची लागवड करण्यात अाली अाहे. याशिवाय, संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी माेठ्या प्रमाणात वृक्षाराेपण अाणि वृक्षसंवर्धन केले जात अाहे.

विद्यार्थिद शेतसंस्कार रुजविणारा अल्फा क्लब : विद्यार्थिदशेपासूनचपर्यावरण संवर्धनाचे संस्कार बालमनावर रुजविण्याच्या हेतूने अल्फा ग्रीन क्लबच्या वतीने निसर्गाशी संवाद साधण्याचा विशेष उपक्रम सुरू अाहे. त्यात विद्यार्थ्यांना निसर्गरम्य वातावरणात येऊन पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात येते. शिवाय, वृक्षाराेपण अाणि संवर्धन कसे करायचे, त्यासाठी काेणती काळजी घ्यावी, याच्या प्रात्यक्षिकावरही भर देण्यात येताे. इयत्ता पाचवी ते अाठवीपर्यंतच्या वर्गातील प्रत्येकी १५ विद्यार्थ्यांचा एक समूह तयार करून त्यांची बारदान फाटा येथील अल्फा नर्सरीत विनामूल्य कार्यशाळा घेण्यात येते. गेल्या वर्षी क्लबच्या वतीने विविध भागांत दीडशे राेपांची लागवड करण्यात अाली. ही राेपे संबंधित परिसरातील साेसायटी अपार्टमेंट्सच्या सदस्यांनी दत्तक घेतली. या उपक्रमास प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदा ५०० राेपे लावण्यात अाली.
करता सातत्याने राबविले जातात उपक्रम
दुर्मिळ वनाैषधींच्या राेपांची लागवड करून अभिनव पद्धतीने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी अस्तित्व साेशल फाउंडेशनने घेतली असून, या संस्थेच्या माध्यमातून साडेपाच हजार वृक्षांचे राेपण करण्यात अाले अाहे. त्र्यंबकेश्वरजवळील श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या जवळील डोंगरावर दुर्मिळ वनस्पतींची लागवड या महिला स्वयंसेवकांनी केली अाहे.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे व्यवस्थापक चंद्रकांत माेरे यांचे माेलाचे सहकार्य मार्गदर्शन लाभले अाहे. त्याचप्रमाणे बाेरगड येथील माध्यमिक अाश्रमशाळा अाणि दरी येथील शाळेच्या परिसरात वृक्षाराेपण करून प्रत्येक वृक्षाची जबाबदारी तेथील विद्यार्थ्यांना देण्यात अाली अाहे. संस्थेने लावलेल्या वृक्षांमध्ये अावळा, सीताफळ, शेवगा, भेंडी या वृक्षांचा समावेश अाहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी तुळसही लावण्यात येत अाहे.
बातम्या आणखी आहेत...