आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षाराेपणासाठी म्हसरूळ परिसरात भरली पर्यावरणप्रेमींची यात्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘वृक्षवल्ली अाम्हा साेयरी वनचरे..’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग अाज पर्यावरण जागृतीचा चांगला संदेश बनला अाहे. याच अभंगातून प्रेरणा घेत साेशल नेटवर्किंग फाेरमने महापालिकेच्या मदतीने म्हसरूळ परिसरात संत तुकाराम वनाैषधी उद्यानात तब्बल २५०० राेपांची लागवड केली. यानिमित्ताने सुमारे ४०० नाशिककर एकत्र अाल्याने परिसराला जणू पर्यावरण यात्रेचे स्वरूप अाले हाेते.
म्हसरूळच्या चामरलेणीच्या पायथ्याशी महापालिकेने दिलेल्या सहा एकर जागेत साेशल नेटवर्किंग फाेरमच्या माध्यमातून वनाैषधी नक्षत्रवन विकसित केले जात अाहे. या उद्यानात वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच यापासून तर हिरडा, बेहडा, अडुळसा, अावळा, बेल अादी प्रकारच्या २५०० राेपांची लागवड करण्यात अाली. या साेहळ्यास दाेन वर्षांच्या चिमुकल्यापासून नव्वद वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सहभागी झाले हाेते. सहकुटुंब सहभागी हाेणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय हाेती. उपक्रमास उपस्थित असणाऱ्यांनी खड्डे खाेदण्यापासून राेप लागवडीपर्यंतची कामे केली. २५०० राेपांची लागवड सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत हाेईल, असे अपेक्षित हाेते. प्रत्यक्षात उपस्थितांचा उत्साह इतका दांडगा हाेता की, वृक्षाराेपणाचे काम सकाळी ११ वाजताच संपले. नगरसेविका रंजना भानसी यांच्या हस्ते वृक्षाराेपण करून कार्यक्रमाचे उद‌्घाटन झाले. यावेळी नगरसेविका शालिनी पवार, अरुण पवार, अनिल चव्हाण, एचपीटी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, ‘तान’ संस्थेचे अध्यक्ष दत्ता भालेराव, दिशा फाउंडेशनचे राजीव भामरे, किशाेर सूर्यवंशी स्कूलचे विजय बाविस्कर, वाॅव महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी न्याहारकर, पाेलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, तहसीलदार कैलास कडलग अादी उपस्थित हाेते.
यासंस्थांनी घेतला सहभाग : साेशलनेटवर्किंग फाेरमच्या या उपक्रमात शासकीय संस्थांसह नाशिक शहरातील विविध संस्थांनी सहभाग नाेंदविला. यामध्ये महापालिका, महाराष्ट्र शासनाचा वनविभाग, सामाजिक वनीकरण, एचपीटी महाविद्यालय, ट्रॅव्हल एजंट असाेसिएशन, दिशा फाउंडेशन, वाॅव महिला मंडळ, किशाेर सूर्यवंशी इंटरनॅशनल ग्रुप, राजयाेग ट्रॅव्हल्स, विद्यानिकेतन परिवार, सिलिकाॅन व्हॅली, चाटे ज्युनिअर काॅलेज, पेठ तालुका शैक्षणिक विचारमंच अादींचा समावेश हाेता.

यांनी
घेतले परिश्रम : साेशलनटवर्किंग फाेरमचे अध्यक्ष प्रमाेद गायकवाड, अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे, डाॅ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, अॅड. गुलाब अाहेर, डाॅ. प्रशांत देवरे, राजेश बक्षी, अॅड. संदीप अावारे, प्रा. अाशिष चाैरासिया, रामदास शिंदे, वैभव उपासणी, डाॅ. उत्तम फरताळे, डाॅ. संदीप अाहिरे, डाॅ. क्रांती म्हसदे, डाॅ. मनीष देवरे, राम राठाेड, प्रशांत पाटील, विजय बाविस्कर अादी.

२१ हजारांची मदत
साेशल नेटवर्किंग फाेरमने संत तुकाराम वनाैषधी उद्यानाचे हाती घेतलेले काम लाेकसहभागातून केले जाणार अाहे. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी जेम्स प्रायमरी स्कूलच्या वतीने २१ हजारांची मदत फाेरमचे अध्यक्ष प्रमाेद गायकवाड यांच्याकडे दिली.
साेशल नेटवर्किंग फाेरमच्या उपक्रमातून वृक्षाराेपणाचे संस्कार बालमनावरही रुजविण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...