नाशिक - राज्यभरात दाेन काेटी वृक्षलागवड करण्याच्या राज्य शासनाच्या निर्धारांतर्गत प्रत्येक विभागाला वृक्षाराेपणाची उद्दिष्टे देण्यात अाली अाहेत. उद्देश चांगला असला तरी त्याचे ‘अान्हीक’ उरकण्याचे काम शासकीय विभागांच्या वतीनेच कसे केले जाते, त्याचे उदाहरण म्हणजे ‘शिवाजी स्टेडियम’वर करण्यात अालेले वृक्षाराेपण अाहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी विभागाच्या वतीने शिवाजी स्टेडियमच्या कन्या शाळेकडील भागात स्टेडियमच्या ट्रॅकला अगदी लागून हे वृक्षाराेपण करण्यात अाले. काेणत्याही माेठ्या स्टेडियमवर अशाप्रकारे वृक्षाराेपण केल्यास ती झाडे (कदाचित माेठी झाल्यास) भविष्यात अडचणीची ठरू शकतात. या बाबीचा विचार करता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने हे वृक्षाराेपण करण्यात अाल्याचे दिसून येत अाहे.
वाॅलकंपाउंडजवळ पुरेशी जागा : छत्रपतीशिवाजी स्टेडियमच्या ८०० मीटरच्या ट्रॅकपासून काहीशी लांब अाणि मैदानाला घातलेल्या वाॅल कंपाउंडनजीक पुरेशी जागा उपलब्ध हाेती. मात्र, तरीदेखील त्या जागेचा विनियाेग करण्याचे टाळून मैदानाच्या ट्रॅकला लागून वृक्षाराेपणासाठी खड्डे खाेदून त्यात वृक्षाराेपण करण्यात अाले असल्याचेही दिसून येत अाहे.
नियाेजन शून्यतेचा परिचय : अशाप्रकारेवृक्षाराेपण करून क्रीडा विभागाने नक्की काय साधले, असा सवाल मैदानावर येणाऱ्या खेळाडूंसह क्रीडाप्रेमींनी केला अाहे. अशा वृक्षाराेपणातून जागेचा अपव्यय, खेळाडूंना बाधा तसेच वृक्षाराेपणासाठी करण्यात अालेल्या निधीचाही अपव्यय करण्यात अाला असल्याच्या चर्चा बहरू लागल्या अाहेत.
क्रीडांगण हवे माेकळे
काेणतेही क्रीडांगण हे जितके भव्य अाणि माेकळे, तितके ते खेळाडूंना अधिकाधिक उपयुक्त असते. हा नियम काेणत्याही मैदानी खेळाला लागू हाेताे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी स्टेडियममध्ये करण्यात अालेले वृक्षाराेपण हे काेणत्या निकषावर करण्यात अाले, अशी विचारणा क्रीडाप्रेमी करू लागले अाहेत.