आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षा उडविणाऱ्या तीन पाेलिस कर्मचाऱ्यांचे हाेणार निलंबन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भद्रकाली पोलिस ठाण्याजवळील फुले मार्केटसमोर पोलिस वाहनाने परिसरात उभ्या असलेल्या चार ऑटोरिक्षांना बुधवारी रात्री उडवले हाेते. या प्रकरणी पोलिस मुख्यालयाच्या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची कार्यवाही सुरू असून, त्याबाबतचे पत्र देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, गुरुवारी या तिघांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात अाली.

या अपघातानंतर परिसरात गर्दी वाढल्यामुळे हे तिघे पोलिस कर्मचारी फरार झाले. या घटनेनंतर भद्रकाली पोलिस ठाण्यात या तिघांविरोधात अतिगतीने वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, यासंदर्भात भद्रकाली पोलिसांकडून संपूर्ण माहिती मुख्यालयात देण्यात आली. यानंतर पोलिस कर्मचारी पोपट साहेबराव ठोंबरे (वाहनचालक), गणेश दिवे, निखिल साळवे या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्याची कार्यवाही सुरू असून, शुक्रवारी त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...