आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्राेपित वृक्षांना पालवी, अन्य धाेकेदायक वृक्ष पुनर्राेपित करण्याचा मार्ग माेकळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरवासीयांसाठी धाेकेदायक ठरणाऱ्या १२० वृक्षांचे पुनर्राेपण करण्यात अाल्यानंतर दाेन महिन्यांतच या वृक्षांना पालवी फुटली अाहे. त्यामुळे पुनर्राेपणाचा प्रयाेग यशस्वी हाेण्यावर शिक्कामाेर्तब झाले असून, अागामी काही दिवसांत उर्वरित वृक्षांचेही पुनर्राेपण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे.
शहरात ठिकठिकाणी रस्त्यातच धाेकेदायक वृक्ष असल्याने ते अपघातास कारणीभूत ठरत अाहेत. अाजवर अनेकांना या वृक्षांमुळे प्राणदेखील गमवावा लागला अाहे. जेहान सर्कल ते गंगापूरराेड या भागात तब्बल ३२० वृक्ष रस्त्यात अाणि रस्त्याच्या जवळपास अाहेत. त्यात वड, पिंपळ अाणि नांद्रुक या वृक्षांसह रस्त्याच्या बाजूचे वृक्ष वगळता सुमारे २०० वृक्ष ताेडण्यायाेग्य अाहेत. या वृक्षांमुळेच अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचा अाजवरचा अनुभव अाहे. गेल्या चार वर्षांत सहा जणांना या परिसरात झालेल्या अपघातांत जीव गमवावा लागला अाहे, तर ५० पेक्षा अधिक वाहनचालक या वृक्षांमुळे जखमी झाले अाहेत. या पार्श्वभूमीवर गंगापूरराेडवरील ४२ वृक्षांचे पुनर्रोपण पालिकेतर्फे करण्याचे नियाेजन अाहे.

पेठरोडमार्गे नाशिकरोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी महापालिकेने सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी तारवालानगर ते अमृृतधाम चौफुली ते पुढे टाकळीरोडपर्यंत चारपदरी रिंगरोड तयार केला. हाच रस्ता तारवालानगरपासून पुढे दिंडोरीरोडमार्गे (मार्केट यार्डजवळून) थेट मखमलाबाद रस्त्याला जाऊन मिळतो. त्यामुळे मखमलाबाद, दिंडोरीरोड, पेठरोडवरून मालेगाव, औरंगाबाद अथवा थेट नाशिकरोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता अत्यंत जवळचा आणि कमी वर्दळीचा ठरत आहे. रिंगरोड तयार करण्यामागील महापालिकेचा हेतू साध्य उर्वरित.पान
दिंडाेरीराेड, तपाेवन गंगापूरराेड येथील रस्त्यातील धाेकेदायक ठरणारे वृक्ष हटवून त्यांचे पुनर्राेपण टाकळी येथे माेकळ्या जागेत करण्यात अाले. या वृक्षांना अाता चांगली पालवी फुटली असून, वृक्ष पुनर्राेपणाचा हा प्रयाेग यशस्वी ठरला अाहे.

या परिसरातील वृक्ष पुनर्राेपित करण्याची गरज
{ मुंबई नाका ते सीबीएस यामार्गे अशाेकस्तंभ परिसर
{ तिडके काॅलनी ते गाेविंदनगर
{ जेहान सर्कल ते बारदान फाटा
{ कलानगर ते पाथर्डी गाव
{ पेठराेड ते राऊ हाॅटेल चाैक
{ अाैरंगाबादराेड ते लक्ष्मीनारायण पूल
{ अाैरंगाबादराेड ते टाकळी एसटीपी (सायखेडाराेड परिसर)
{ नांदूर नाका ते हाॅटेल जत्रा
{ दिंडाेरीराेड ते मखमलाबादराेड
{ कॅनाॅलराेड जंक्शन ते विजय-ममता थिएटर
{ पपया नर्सरी ते गरवारे पाॅइंट
बातम्या आणखी आहेत...