आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Trees Cutting Issue Legal Notice To Singer Suresh Wadkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना वृक्षतोडप्रकरणी नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना नाशिक महापालिकेकडून अनधिकृतरीत्या वृक्ष तोडल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

नाशिकरोडच्या मुक्तिधाम परिसरातील सव्र्हे क्रमांक 7/1 येथील जमिनीवरील वृक्षतोडीमुळे झाडांवरील पक्ष्यांची घरटी नष्ट केल्याने पर्यावरणाची हानी झाल्याने कारवाई करावी, अशी तक्रार पर्यावरणप्रेमी नितीन रुईकर यांनी महापालिकेकडे केली होती. रुईकर यांच्या तक्रारीनुसार ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती महापालिकेने माहितीच्या अधिकारांतर्गत रुईकर यांना दिली आहे. वाडकरांशी संबंधित या जागेवरील बाभळीचे 26 वृक्ष 3 मे 2013 रोजी तोडले होते. त्यासाठी पालिकेची परवानगी घेतली नव्हती, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे असून याबाबत पालिकेकडे तक्रार केली होती. त्यानुसार, वाडकर यांना नोटीस बजावण्यात आली असून, चार दिवसांत लेखी स्पष्टीकरण मागविण्यात आले असले तरी पालिकेने माहितीच्या अधिकारात काय कारवाई झाली, याची माहितीच दिली नसल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.