आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी विकास विभाग: शिक्षक-लिपिकांच्या भरतीत मोठा भ्रष्टाचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आदिवासी विकास विभागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिक्षक आणि लिपिक भरतीत मोठा गैरव्यवहार झाला आहे. उमेदवारांकडून कर्मचारी विनोद घनश्यामसिंह परदेशी याने पैसे घेऊन कामे केली. परंतु, काम झालेल्या दोघांनी पैशांचा तगादा लावल्यानंतर त्यांना धनादेशाद्वारे पैसे परत करण्याचा प्रयत्न फसला. धनादेश वटल्याने त्याचे बिंग फुटल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी महामंडळाच्या वार्षिक सभेत आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्यासमोर करत याबाबत कारवाईची मागणी केली.

आदिवासी विकास विभाग आणि भ्रष्टाचार हे जणू समीकरण झाले आहे. महामंडळाची मुदत संपल्यानंतरही अधिकारी त्याची माहिती दडवून ठेवतात. दुसरीकडे आदिवासी विभागातील नोकरभरतीतही मोठा भ्रष्टाचार असून, त्यात अधिकारी कर्मचारीच सहभागी असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिक्षक आणि लिपिक भरतीत पैसे घेऊन तेथील कर्मचाऱ्यानेच अनेकांची भरती केली. ज्यांची भरती झाली नाही त्यांनी पैशाचा तगादा लावला. त्र्यंबकेश्वरची काही मुले माझ्याकडे परवा आली होती. त्यांनी याबाबत माहिती देताना परदेशीने त्यांच्याकडून भरतीसाठी पैसे घेतल्याचे सांगितले. आता तो पैसे परत करत नाही. मागणी केली असता त्याने धनादेशही दिले. पण, बाळू भास्कर भोये यांना दिलेला दोन लाखांचा, तर नारायण भोये यांना दिलेला एक लाखाचा धनादेश वटलाच नाही. त्यामुळेच हे प्रकरण बाहेर आल्याचा आरोप खासदार चव्हाणांनी महामंडळाच्या वार्षिक सभेत केला, तसेच पत्रकारांनाही त्याची माहिती देताना ते वटलेले धनादेशही सादर केले. आदिवासी मंत्री सावरांकडे या प्रकरणी कारवाईची त्यांनी मागणी केली. तसेच, खात्याच्या सचिवांनाच त्यांनी बदनामीबाबत दोषी धरत सावरा आता देवरांना आवरा, असेही व्यासपीठावरून जाहीर सांगितले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत बसविता वेगळ्या वर्गात वेगळ्या शिक्षकांकडून शिकविले जात असल्याचा आरोप करत अशा संस्थांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली. त्यावर सावरांनी अशा संस्थांचे अनुदान बंद करत लागलीच इतर संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे अाश्वासन दिले.
बातम्या आणखी आहेत...