आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायल, आफ्रिकी, जर्मन तंत्राने फुलली आदिवासी दांपत्याची आमराई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुबलक परंतु असमतोल जमीन.. पाण्याची वाणवा.. पावसावरच होणारी भातशेती.. तुटपुंज्या उत्पन्नामुळे परिस्थिती बेताचीच.. वयाने पन्नाशी गाठलेली, पण तरीही शेतीत नवे करून दाखवण्याची उमेद.. त्यामुळे युवा शेतकरी व मुलांसोबत चर्चा करून ज्ञान मिळवण्याची तयारी... या सगळ्यांच्या जोरावर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड या आदिवासी पट्ट्यातील दामोदर वाघेरे आणि त्यांच्या पत्नी सुंदराबाई यांनी शासनाचे अनुदान न घेता इस्रायल, जर्मन आणि दक्षिण अाफ्रिकेच्या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात प्रथमच चार एकर क्षेत्रामध्ये ३५०० केशर आंब्याच्या झाडांची लागवड केली. यंदा त्यांच्या उत्पादनाचे तिसरे वर्ष असून, वर्षाकाठी त्यांना १३ लाख रुपये उत्पन्न मिळते.
अवेळी पाऊस, पारंपरिक पीक असलेल्या भात उत्पादनाचा वाढणारा खर्च यामुळे या दांपत्याने दुसरे पीक घेण्यासाठी विचार सुरू केला होता. मात्र, आपली शेती ही इतरांपेक्षा वेगळी असावी म्हणून सातत्याने शोध घेत होते. मुलगा जनार्दन यांनी परदेशातील आंबा शेतीबाबत इंटरनेटवर माहिती मिळवली. आई-वडिलांना दिली. त्या अाधारे वाघेरे दांपत्याने इस्रायल, जर्मन आणि दक्षिण अाफ्रिका या देशांच्या पुढे जाऊन आंबा झाड लागवडीमध्ये केवळ ३ फुटाचे अंतर ठेवले. एकीकडे राज्यातील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आंब्याची २५ ते ३० फुटाच्या अंतरावर लागवड करण्यास सांगत असल्याने एका एकरात खूपच कमी झाडांची लागवड होत असे. भारतीय पद्धतीनुसार केलेल्या लागवडीनुसार १० वर्षांत मिळणारे उत्पादन वाघेरे यांच्या पद्धतीने ३ वर्षांतच घेता येते. वाघेरे यांनी ३ बाय १५, ४ बाय १५ आणि ३ बाय १० फुटावर अशा प्रकारे लागवड करून ४ एकरमध्ये ३५०० आंब्याची झाडे लावली आहे. वर्षाकाठी सुमारे १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
करंजाळीने घेतला आदर्श, १० एकरवर आंबा लागवड
^सघन पद्धतीने (क्लोज प्लान्टेशन) ही भारतातील पहिलीच पद्धत असून, कमी जागेत अधिक झाडांची लागवड होते. त्यामुळे उत्पन्नही वाढले आहे. आमची ही पद्धत पाहून कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, मालेगाव आणि जिल्ह्यातील शेतकरी आंबा बाग पाहण्यासाठी येऊन गेले. राहुरी कृषी विद्यापीठाचे कृषी शास्त्रज्ञांच्या पथकानेही भेट देऊन अभ्यासाला सुरुवात केली आहे. ही पद्धत पाहून करंजाळी भागातील शेतकऱ्यांनी १० एकर क्षेत्रावर लागवड केली आहे.
- जनार्दन दामोदर वाघेरे, आंबा उत्पादक
बातम्या आणखी आहेत...