आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात आदिवासींचा हक्कांसाठी ‘लोकसंघर्ष’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक विभागातील नंदुरबार, जळगांव व धुळे जिल्हयातील असंख्य आदिवासींनी विविध मागण्यांसाठी बुधवारी प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महसूल आयुक्तालयावर लोक संघर्ष मोर्चाव्दारे धडक मारली. रेल्वेने नाशिकरोडला आलेल्या आदिवासींनी शिवाजी पुतळा, मेनगेट मार्गे शिस्तबध्द पद्धतीने घोषणाबाजी करीत विभागीय कार्यालय गाठले. मोर्चा अडविण्यासाठी मेनगेट रस्त्यावर विभागीय कार्यालयाच्या अलिकडे सहायक पोलिस आयुक्त कार्यालयासमोर लावलेले बॅरिकेटस् पाडून मोर्चा कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर दाखल झाला. सामान्य प्रशासन उपायुक्त अरुण अभंग मोर्चाला सामोरे गेले.
दरम्यान, रात्री उशीरापर्यंत आदिवासीनी मागण्यांसाठी आंदोलन सुरुच ठेवले होते. आयुक्त भेटीस येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे आंदोलक व पोलिस यांच्यात काही काळ बाचाबाचीही होऊन वातावरणात तणाव निर्माण झाला होता. नंतर मात्र पोलिसांनी आंदोलकांचे शिष्टमंडळ उपायुक्तांच्या भेटीसाठी सोडल्याने वातावरण शांत झाले. मोर्चात दीपू पवार, प्रभू राठोड, रामदास तडवी, दशरथ चव्हाण, देवा मोरे, रमजान तडवी, सरदार तडवी, मंगसिंग नाईक, सुभाष पवार,रमेश नायक, चंपालाल नाईक, काथा वसावे, शशी बारेला, छिला वसावे, अतुल पाटील, श्याम पाटील, प्रियदर्शन भारतीयसह दोन हजार आदिवासी मोर्चात सहभागी झाले.