आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उजळले लक्ष लक्ष दिवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - त्रिपुरारी पौर्णिमा, तुळशीविवाह आणि कार्तिक महोत्सव... धार्मिक कार्यक्रमांच्या या त्रिवेणी सोहळ्यानिमित्त बुधवारी शहरभरात भाविकांची मांदियाळी आणि दीपोत्सवाचा लखलखाट होता.
गंगापूरराेडवरील श्री बालाजी मंदिर त्याच्या प्रांगणात हजाराे दिव्यांची राेषणाई करण्यात अाली हाेती. या दिव्यांच्या प्रकाशात उजळणारे बालाजी मंदिर अाणि संपूर्ण परिसर एका अनाेख्या झळाळीने न्हाऊन निघाला हाेता. या वेळी शेकडाे नाशिककर माेठ्या संख्येने अाणि भक्तीभावाने पारंपरिक पाेषाख परिधान करून या साेहळ्यात सहभागी झाले हाेते.

गाेदाघाट लखलखला : गाेदाघाटावरनागरिकांसह पुराेहित संघाने रामकुंड, गंगा-गाेदावरी मंदिर लखलखून टाकले हाेते. यानंतर अनेक पुराेहितांच्या उपस्थितीत गंगामातेची अारती करण्यात अाली. या साेहळ्यासदेखील अनेक भाविक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

सायकलिस्टनी उजळवला जेसिका फार्म
नाशिक सायकलिस्ट असाेसिएशनकडून गंगापूरराेडवरील जेसिका फार्मवर प्रथमच त्रिपुरी पाैर्णिमेचे अाैचित्य साधून अनाेखी दिव्यांची रांगाेळी काढण्यात अाली. त्यात नाशिक सायकलिस्टच्या लाेगाेची रांगाेळी साकारून त्यावर अनेक सायकलप्रेमींनी स्वहस्ते पणत्या लावून या दीपाेत्सवानिमित्त संपूर्ण परिसराला उजळवून टाकले.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा गोदाघाटातील काही निवडक फोटोज...