आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-मोटारसायकल अपघातात दोन युवक ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर - सातपूर पोलिस ठाण्यासमोर ट्रक व मोटारसायकल यांच्यात रविवारी (दि. 15) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या अपघातात अंबड गावातील दोन युवक जागीच ठार झाले असून, एक गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील मृत हे मामा-भाचे असल्याचे समजते. जखमी युवकावर बालाजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सातपूर पोलिस ठाण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणा-या ट्रकने (क्र. एमएच 15 बीजे- 4999) सुझुकी मोटारसायकलीस (क्र. एमएच 16 जी- 4796) जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलीवरील पिंटू संतोष खैरनार व गौतम जगन झाल्टे हे 23 वर्षीय युवक जागीच ठार झाले, तर आबा झाल्टे हा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर बराच वेळ जखमी व मृतदेह रस्त्यावर पडून होते.
कॉँग्रेसचे शहर सरचिटणीस दीपक राव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून, पोलिसांनी महात्मानगर परिसरातील टायटन शो-रूमजवळ अपघातग्रस्त ट्रक पकडला.