आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावेळी ट्रकचा ब्रेक फेल, माेहदरी घाट तब्बल पाच तास ठप्प!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात एका ट्रकचा पाटा तर अन्य एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने वाहतूक कोलमडली. दोन्ही बाजूने सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल तास ठप्प झाली. तीन दिवसांत दुसऱ्यांदा वाहतूक काेंडी झाल्याने महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न एेरणीवर अाला अाहे.

ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. घाटातील वळणावर गुरुवारी सकाळी ६.३० ला सिन्नरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचे पाटे तुटले. त्यामुळे तो अडकून पडल्याने क्रेनच्या साहाय्याने त्याला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्याच ठिकाणी नाशिककडे जाणाऱ्या अन्य एका ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे दोन्हीही ट्रक रस्त्यात उभे राहिल्याने वाहतूक ठप्प झाली. यामुळे प्रवाशांसह मालवाहतूकदारांची प्रचंड गैरसाेय झाली. दरम्यान, दुपारी १२.३० नंतर वाहतूक सुरळीत झाली.

पोलिसांचे संख्याबळ अपुरे
एमआयडीसी पोलिस ठाण्यातील १८ कर्मचाऱ्यांना गणेशाेत्सवातील कोकणात बंदोबस्ताला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे उपलब्ध संख्याबळ अपुरे आहे. त्याचाही परिणाम कामकाजावर झाल्याचे चित्र आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तब्बल पाच तास लागले.

पास्तेमार्गे वाहतूक
सिन्नरच्या दिशेने येणारी वाहने मोहगावापासून पास्तेमार्गे वळविण्यात आली, तर सिन्नरहून नाशिककडे जाणारी वाहने सरदवाडी मार्गाने पास्तेच्या दिशेने काढण्यात आली. एमआयडीसी पोलिसांनी ट्रक बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले. दुपारी १२ वाजेनंतर संथगतीने वाहतूक सुरू झाली.

क्रेनचा वापर करण्याच्या पर्यायाची अंमलबजावणी नाही
सोमवारी ट्रक बंद पडल्याने वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. महामार्गावर किरकोळ अडथळ्याने वाहतूक ठप्प होण्याची आठवडाभरातील तीन दिवस तर महिनाभरात ही चाैथी वेळ आहे. नादुरुस्त ट्रक बाजूला करण्यासाठी क्रेनचा वापर करण्याचा पर्याय ठेवण्यात आला असला तरी अद्याप त्यावर अंमलबजावणी झालेले नाही.
बातम्या आणखी आहेत...