आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Truck Hit To Sai Devotee ; One Death, Four Injured

साईभक्तांना ट्रकची धडक; एक ठार, चार जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुंबईहून शिर्डीला जाणार्‍या साईभक्तांच्या पालखी पदयात्रेत भरधाव ट्रक घुसून झालेल्या अपघातात एक साईभक्त जागीच ठार झाला, तर इतर चार पदयात्री गंभीर जखमी झाले. या जखमींवर घोटीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात इगतपुरीजवळील तळेगाव शिवाराजवळील साई कुटीर विर्शामस्थानासमोर घडला. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कल्याण व घाटकोपरजवळील भटवाडी येथील साई पालख्या रविवारी रात्री इगतपुरी शहराजवळील साईभक्तांच्या निवासासाठी असलेल्या साई कुटीर या विर्शामस्थानात मुक्कामासाठी थांबल्या होत्या. पहाटेच्या सुमारास यातील साई पदयात्री शिर्डीच्या दिशेने जात असताना, नाशिकच्या दिशेने वेगाने जाणारा ट्रक (ओआर 15 एन 5727) हा पदयात्रींच्या वाटेत घुसला. त्या धक्क्याने या पदयात्रींपैकी गौतम सुरेश मरोठिया ( 20) हा जागीच ठार झाला. तर अभिषेक चंद्रकांत वाव्हळे (35),
योगेश पांडुरंग दिवठणकर (25), प्रसाद नंदू कदम (19) व स्वप्नील शंकर कांबळे (18) (सर्व राहणार कल्याण, मुंबई) हे चार साई पदयात्री गंभीर जखमी झाले. या जखमी साईभक्तांना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून, याबाबत इगतपुरी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.