आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक टर्मिनसकरिता एमआयडीसीकडून भूखंड आरक्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अंबड औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याच्या कडेला उभ्या राहाणाऱ्या अवजड वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. याकरिता एमआयडीसीने एम-४३ हा भूखंड ट्रक टर्मिनसकरिता आरक्षित केला असून, येथे लवकरच बोर्ड लावून अधिकृत पार्किंगही सुरू होणार आहे.

इतकेच नाही तर वसाहतीत इतस्ततः वाहनांची पार्किंग करणे वाहनचालकांना महागात पडणार आहे, पोलिसांकडून अशा वाहनधारकांवरही कारवाईही होणार आहे.

या वसाहतीत उद्योगांत माल घेऊन येणाऱ्या आणि उत्पादने घेऊन जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. ही अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहात असल्याने इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. म्हणूनच वाहनतळाकरिता भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उद्योजकांकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात होती. याला लवकरच मूर्तस्वरूप मिळण्याची चिन्हे आहेत. आगामी सिंहस्थ लक्षात घेता या वाहन तळाची नितांत गरज भासणार असल्याचे उद्योजकांचे म्हणणे असून, मुरूम टाकून लेव्हल करून हा वाहनतळ लगेचच खुला करून देण्याची मागणी पुढे आली आहे, त्यावर कार्यवाहीचेही आश्वासन एमआयडीसीने दलिे आहे.

एमआयडीसीने या ट्रक टर्मिनसकरिता आरक्षित या भूखंडावर त्वरित बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी उद्योजक संघटनांकडून होत असल्याने एमआयडीसीने याकरिताचा प्रस्ताव मुख्यालयात पाठविला असल्याचे स्पष्ट केले आहे.
पार्किंगचा प्रश्न गंभीर
अवजड वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी केली जात असल्याने अनेक ठिकाणी कामगार, उद्योजकांना वाहने चालविण्यासह पायी चालणेही अवघड होते. यामुळे हे वाहनतळ लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
ज्ञानेश्वर गोपाळे, माजी अध्यक्ष, आयमा
हजारावर ट्रकांची ये-जा
अंबड एमआयडीसीतून मुंबई, अहमदाबाद, वापी, लखनौ, दलि्ली यांसह देशातील अनेक शहरांत उत्पादित माल पाठवलिा जाताे. तसेच देशातील विविध शहरांतून ये परिसरात कच्चा मालही आणला जाताे. त्याकरिता दविसाकाठी किमान एक हजारावर ट्रकांची येथे ये-जा होत असते.