आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देसाईंनी घेतले गाभाऱ्यात दर्शन, ओल्या कपड्यांनी केली पूजा, सहकाऱ्यांसोबत प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर - दाेन दिवसांपूर्वी स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा वनिता गुट्टे यांनी त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहात जाऊन घेतलेल्या दर्शनाची चर्चा ताजी असतानाच शुक्रवारी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सकाळी तीन महिला सहकाऱ्यांसह गर्भगृहात जाऊन दर्शन घेतले. या वेळी शासकीय अधिकारी उपस्थित असल्याने काेणताही वाद झाला नाही.

तृप्ती देसाई तीन महिला व दाेन पुरुष सहकाऱ्यांसह पहाटे साडेपाचला मंिदराच्या पूर्व प्रवेशद्वाराावर दर्शनार्थ रांगेत उभ्या राहिल्या. ५.५० वाजता तया गाभाऱ्याजवळ पाेहोचताच अाेल्या कपड्यांनीच गर्भगृहात प्रवेश देण्यात येत असल्याचे त्यांना सांगण्यात अाले. देवस्थानचे कर्मचारी अमित टाेकेकर यांनी त्यांना पाण्याच्या टाकीजवळ नेऊन मार्जन करावयास लावले. नंतर त्यांना दर्शनसाठी आत सोडण्यात आले. अनेक महिला संघटनांनी गाभाऱ्यात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोल्‍हापुरात जिल्हाधिकारी, पोलिसप्रमुखांना नोटीस