आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्चंट बँक शाखेवर दरोड्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी उधळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- नाशिकमर्चंट्स को. ऑप बँकेच्या उंटवाडी राेडवरील पाटीलनगर शाखेत शुक्रवारी (दि. १०) रात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने चोर पळून गेले.
शुक्रवारी रात्री वाजेच्या सुमारास बँकेच्या कर्मचारी प्रतिभा भुजबळ मुख्य कार्यालयातून कागदपत्रे घेऊन आल्यानंतर कामकाज करीत असताना दोन बुरखाधारी चोरांनी बँकेत प्रवेश केला. त्यातील एकाने भुजबळ यांच्याकडे पैशाची मागणी करीत तोंड दाबले. तर दुसऱ्याने रोखपाल छाया शिरसाठ यांच्या केबिनमध्ये प्रवेश करून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. याच वेळी हरेंद्र भालेराव या कर्मचाऱ्याने हिंमत करून थेट एका चोराला पकडले. त्याची मान पकडून जिन्यापर्यंत नेले. या झटापटीत भालेराव यांच्या मानेला दुखापत झाली. अन्य कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केल्याने चोरांनी धूम ठोकली. पुढे रस्त्यातील अंधाराचा फायदा घेत ते फरार झाले.

याबाबत माहिती मिळताच अंबडचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. हा सर्व प्रकार बँकेतील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...