आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tryambakeshwar Saddarsana Akhara Council Secretary Mahant Shankaranand

पालकमंत्र्यांच्या मध्यस्थावर त्र्यंबकमधील महंतांचा कोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थाच्या नियोजनाबाबत त्र्यंबकेश्वर षड‌्दर्शन आखाडा परिषदेचे सचिव महंत शंकरानंद सरस्वती यांनी नाराजी तर दर्शविलीच, शिवाय पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावणारे अामदार बाळासाहेब सानप यांच्याही कार्यशैलीवर थेट ताेफ डागली. पालकमंत्र्यांशी संपर्क साधण्याअाधी या अामदार महाेदयांशी संपर्क साधण्याचे सांगितले जाते. मात्र, हे अामदार कधी फाेनच उचलत नसल्याचे ते म्हणाले.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांची भेट घेत विविध विषयांवर मते जाणून घेतली.

त्यांनीशासन प्रशासन या दाेहाेंच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ताेंडावर अालेल्या सिंहस्थाच्या िनयाेजनात प्रचंड अनागाेंदी असून, साधू-महंतांसाठी तसेच भाविकांसाठीही पुरेशा सुविधा पुरविण्याच्या तयारीलादेखील अद्याप सुरुवात झालेली नाही. त्र्यंबकेश्वर परिसरात साधे स्वच्छतागृहदेखील उभारण्यात अालेले नाही. अाखाड्यांसाठी शेड, प्रसाधनगृह पिण्याचे पाणी शासन देते. त्यासाठी प्रत्येक अाखाड्यावर साधारणत: ३० ते ४० लाख रुपये खर्च हाेताे. म्हणजे दहा अाखाड्यांसाठी सुमारे चार काेटी रुपयांच्या अासपास खर्च येताे. मंजुरी मात्र २३०० काेटी रुपयांच्याच कामांना मिळते. मग त्यातून केली जाणारी कामे ही काेणासाठी कशी हाेतात. त्यांचा साधूंना कसा उपयाेग हाेताे. साधूंवर पैसा खर्च केल्याचे फक्त कागदाेपत्री दाखविले जाते. मुळात एकाही अाखाड्याचे काम सुरू नसताना सिंहस्थाची कामे सुरू असल्याचे चित्र निर्माण केले जाते. या सर्व अनागाेंदीस पालकमंत्री गिरीश महाजन हेच जबाबदार अाहेत. साधू-महंतांशी चर्चा करायलासुध्दा त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, प्रथम अामदार बाळासाहेब सानप यांच्याशी चर्चा करणे भाग पडते. म्हणजे सानप हे पालकमंत्र्यांच्या मध्यस्थाचीच भूमिका वठवित अाहेत. खेदजनक बाब म्हणजे सानप हेदेखील कधीही साधू-महंतांचे फाेन उचलत नाहीत. त्यामुळे काेणाच्या भरवशावर हा कुंभमेळा हाेणार, असा प्रश्नही महंत शंकरानंद सरस्वती यांनी उपस्थित केला. िजल्ह्याचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी महाजन यांची असताना ते अामदारांना मध्यस्थ करून कर्तव्याशी प्रतारणा करीत असल्याचा टाेलाही महंतांनी लगावला. शासन जरी बदलले तरी प्रशासकीय अधिकारी तेच असल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचे काैशल्यही या पालकमंत्र्यांकडे नसल्याचे ते शेवटी म्हणाले.

अाखाड्यांवर खर्च फक्त चार काेटी, तर निधी २३०० काेटी
कुंभमेळ्यासाठी२३०० काेटी रुपयांचा निधी मंजूर अाहे. प्रत्येक अाखाड्यासाठी सरासरी ४० लाख गृहीत धरले तर चार काेटी रुपये खर्च हाेताे. उर्वरित िनधी कसा खर्च झाला, याची माहिती देण्याचे उत्तरदायित्व काेणाचे, असा प्रश्नही शंकरानंदांनी उपस्थित केला.