आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलांत नाशिकच्या ब्रँडिंगसाठी प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुंबईत आलेल्या देशी-विदेशी पर्यटकांना विकेंड टूर करिता नाशिकमध्ये येण्यास प्रवृत्त करता यावे त्यातून पर्यटन क्षेत्रास प्राेत्साहन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले अाहेत. तेथील पंचतारांकित हाॅटेलांमध्ये ब्रँडिंग करण्याचा प्रस्ताव नाशिकच्या ट्रॅव्हल एजंट असाेसिएशनने महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाकडे सादर केला अाहे. राज्याच्या राजधानीतील पाचशेहून अधिक पंचतारांकित हाॅटेल्समध्ये उतरणाऱ्या अाणि शनिवार-रविवारी प्रवासाचे िनयाेजन नसलेल्या पर्यटकांना नाशिकच्या एकदिवसीय टूरचा पर्याय दिला तर त्यांना त्याचा अानंद लुटता येईल, त्याबराेबरच नाशिकच्या पर्यटन वाढीलाही हातभार लावता येईल, अशी या प्रस्तावामागील संकल्पना अाहे.
देशाची वाइन कॅपिटल म्हणून नाशिक व्हॅलीचे देश-विदेशातील पर्यटकांना अाकर्षण अाहे. धार्मिक पर्यटनस्थळाबराेबरच जवळच असलेले नांदूरमध्यमेश्वरचे पक्षी अभयारण्य, र्यंबकेश्वर दर्शनासह या परिसरातील अाल्हाददायक वातावरण, प्रदूषणमुक्त पर्यावरण यासारखे पर्याय पर्यटकांना अाकर्षित करतात. दुसरीकडे मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल्समध्ये अनेक प्रवासी िकंवा पर्यटक असेही असतात की, त्यांना एक-दाेन िदवस त्यांच्या कामाकरिता वाट पाहात थांबावे लागते. इतर प्रवासाचे काहीच नियाेजन नसल्याने अाणि मुंबईच्या गर्दीत जावेसे वाटत नसल्याने त्यांना िततका कालावधी िदवस हाॅटेलमध्येच काढावा लागताे. त्यांना हा एक-दाेन िदवसांच्या प्रवासात पर्यटनस्थळे पाहण्याचा प्रस्ताव पाेहाेचविण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाकडून प्रयत्न करण्यात यावेत, यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात अाला अाहे. प्रत्येक हाॅटेल्समध्ये या स्थळांची माहिती देणारे ब्राेशर्स, हाेर्डिंग्ज लावण्यात यावेत, अशी मागणीही या प्रस्तावात असून मंडळाकडून सकारात्मक िवचार झाल्यास नाशिकच्या पर्यटनवाढीला चांगला हातभार लागणार अाहे.
सकारात्मक दृष्टिकाेनाची गरज

पर्यटनविकास महामंडळाकडे अाम्ही दाेन दिवसांपूर्वीच हा प्रस्ताव सादर केला अाहे. त्यावर सकारात्म विचार निर्णय हाेणे अपेक्षित अाहे. त्यामुळे पर्यटकांना त्यांच्या उपलब्ध वेळात पाहिजे तसे टूर पॅकेज उपलब्ध करून देता येईल. दत्ताभालेराव, अध्यक्ष,ट्रॅव्हल एजंट असाेसिएशन, नाशिक