आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या सत्कार साेहळ्यात जुगलबंदी, सुरेशबाबा माणिकरावांचे शाब्दिक चिमटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्र राज्यात सत्तेत असल्यामुळे कमालीचे महत्त्व प्राप्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीत निष्ठावंताच्या गळ्यात माळ टाकली गेल्यानंतर झालेल्या सत्कार साेहळ्यात नवीन जुना वाद चांगलाच उफळून अाला. विशेष म्हणजे, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना चिमटा काढल्यानंतर त्याचे रूपांतर टाेलेबाजीत झाले. ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी मुद्यालाच हात घातल्यानंतर स्वभावाप्रमाणे माणिकराव काेकाटे यांनी तडाखेबंद फलंदाजी केली खरी. मात्र, नेहमीच घसरत जाणार नाही, याचे भान ठेवत एकदिलाने काम केले, तरच पक्षाचा उत्कर्ष हाेईल, अशी कळकळ व्यक्त केली. या सर्वात खासदार हरिश्चंद्र चव्हाण अामदार राहुल अाहेर यांनी कडी करत गटबाजी करता काम करावे, असा सल्ला देताना पक्षात एकट्या दुकट्याचे चालत नसल्याचाही नवीन पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला.

‘वसंत स्मृती’ या पक्ष कार्यालयात गुरुवारी जिल्हाध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया झाली. जळगाववरून अालेले निरीक्षक सुनील बडे यांनी सर्वांशी चर्चा करून जिल्हाध्यक्षपदाचे नाव अंतिम केले. मात्र, त्याची घाेषणा करण्यासाठी खास सत्कार साेहळाच अायाेजित केला. या साेहळ्यात बडे यांनी निवडणूक प्रक्रियाच उलगडून सांगितली. साधारण पक्षात लाेकशाही पद्धतीने निवडणूक अपेक्षित अाहे. यंदाही त्याच पद्धतीने निवडणूक सुरू झाली. मात्र, जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत अाल्यावर मग सर्वांनी मिळून एकमताने निर्णय घेण्याचे ठरवले. त्यासाठी काेअर कमिटी, तालुकाध्यक्ष, समन्वय समिती अशा सर्व सदस्यांची मतमतांतरे जाणून घेतली. प्रत्येकाचे काम, अावाकाही लक्षात घेतला सर्वानुमते पक्षाशी अनेक वर्षांपासून याेगदान देणाऱ्या दादाजी जाधव यांना संधी देण्याचे ठरले. बडे यांच्यानंतर बॅटिंगसाठी अालेल्या सुरेशबाबा पाटील यांनी घसादुखीमुळे जास्त वेळ घेणार नाही, असे सांगताना चार-दाेन षटकारातच सामन्याचा रंग पालटून टाकला. ते म्हणाले की, राजकारण अाता बदलत चालले असून, पक्षात अनेक लाेक येतात जातातही. मात्र, भाजपने एका प्रामाणिक कार्यकर्त्याला नेतेपदावर बसवल्यामुळे ऊर भरून अाला. भाजपमध्ये अाम्ही अनेक वर्षांपासून असून, येथे पुढे पुढे करून पद मिळत नाही, असाही चिमटा घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी अालेल्या काेकाटे यांनी चाैफेर टाेलेबाजी सुरू केली. ते म्हणाले की, भाजपत नवीन असल्यामुळे येथील प्रक्रियेची फारशी माहिती नव्हती. मात्र, अाता सर्व माहीत झाले. जिल्हाध्यक्षपदासाठी अापण फारसे इच्छुक नसलाे तरी माझेही नाव चर्चेत हाेते. मुळात माझ्या दृष्टीने हे शाेभेचे पद असून, जिल्हा बँक, दूध संघ अन्य संस्थांची जबाबदारी बघता या पदाला न्याय देण्यासाठी माझ्याकडे पूर्ण वेळही नाही. याउलट दादाजी यांचे अातापर्यंतचे याेगदान वेळ लक्षात घेता तेच पदाला न्याय देऊ शकतील. पक्षात नवीन जुना वाद निर्माण करण्याचे काेणतेही कारण नसून, अनेक वर्षांनी सत्ता मिळाल्यामुळे पक्षात पदासाठी गर्दी हाेणे स्वाभाविक असल्याचाही चिमटा घेतला. संघटना चालवणे अत्यंत मुश्कील काम असून, अध्यक्षाला खासदार, अामदार माेजत नसल्याचा अनुभवही सांगितला. या पार्श्वभूमीवर नवीन जुना वाद अंतिमत: विशिष्ट व्यक्ती नाही; तर पक्षासाठी घातक असल्याचाही संदेश त्यांनी दिला. अामदार राहुल अाहेर यांनी अनेक माेठे नेते पदासाठी इच्छुक असताना, सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन पक्षाने नवीन संदेश दिल्याचे सांगितले. ज्यांच्यात गुणवत्ता आहे त्यांनाच संघटनेत सक्रिय करावे, असाही सल्ला दिला.

दाेघांच्या भांडणात चव्हाणांचा लाभ
अागामीिजल्हा परिषद निवडणूक लक्षात घेता अाक्रमक चेहरा म्हणून काेकाटे यांचे नाव चर्चेत हाेते. काेकाटे यांना शहरातील तिन्ही अामदारांची अनुकूलता हाेती. मात्र, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मतदारसंघातच जिल्हाध्यक्षपदाचा चेहरा देण्यासाठी एक गट अाग्रही हाेता. त्यातच अपूर्व हिरे यांनी बंधू अद्वय यांच्यासाठी ताकद पणाला लावली. काेकाटे हिरे यांच्यात रस्सीखेच सुरू झाल्यावर मग दाेघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, याप्रमाणे चव्हाण यांचे समर्थक दादाजी जाधव यांची निवड झाल्याचे बाेलले जाते. जाधव हे अामदार राहुल अाहेर यांच्या मतदारसंघातील असल्यामुळे दाेन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचेही सांगितले जाते.

महामंडळाचे गाजर
जिल्हाध्यक्षपदाचीसंधी गेल्यावर अाता नाराजांना चुचकारण्यासाठी महामंडळे शासकीय समित्यांचे गाजर दाखविण्यात अाले. संघटनेत काम करणे अवघड असून, काही नेत्यांना पात्रतेप्रमाणे महामंडळ शासकीय समित्यांमध्ये सामावून घेतले जाईल खासदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.
छायाचित्र: भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दादाजी जाधव यांचा सत्कार करताना खासदार हरिश्चंद्र चव्हाण. सोबत भाजप पदाधिकारी.