नाशिक - महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाचा उत्तम कांबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर अाता पक्षांतर्गत गटनेतेपदासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू झाली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून सुरत दाैऱ्यासाठी तब्बल तीन अनुभवी नगरसेवकांनी हजेरी लावल्याची बाब चर्चेचा विषय ठरली.
प्रकृतिअस्वास्थ्यामुळे दीड महिन्यापूर्वीच कांबळे यांनी राजीनामा दिला हाेता. कांबळे यांचा कार्यकाळही संपला हाेता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महापालिकेतील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला हाेता. गटनेता नसल्यामुळे गटबाजी वाढली हाेती. पक्षाची ठाेस भूमिकाही दिसत नव्हती.
उत्तम कांबळे यांच्या राजीनाम्यानंतर अाता स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, माजी गटनेते लक्ष्मण जायभावे, शाहू खैरे, शिवाजी गांगुर्डे यांचे प्रयत्न सुरू झाले अाहेत. अश्विनी बाेरस्ते याेगिता अाहेर या नगरसेविकांची नावेही चर्चेत अाहेत. दरम्यान, महासभेत नवीन गटनेत्याचे नाव जाहीर हाेण्याची शक्यता अाहे.