आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर खरेदीला सात दिवसांची मुदतवाढ; सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केंद्र सरकारतर्फे राज्यात सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रांना सात दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंतच अाधीची मुदत असल्याने त्यानंतर तूर खरेदी ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अद्याप ३० लाख क्विंटल तूर खरेदीच्या प्रतीक्षेत असल्याने राज्याने केंद्राकडे १५ मेपर्यंत खरेदी केंद्रे सुरू ठेवण्याची मुदत मागितली होती. परंतु केंद्र सरकारने २२ एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...