आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमहापौरांच्या प्रभागात गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- खोडेनगर, अनसूया कॉलनी, वडाळा-उपनगर रोड येथे आठवडाभरापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. नळातून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या ठिकाणी वडाळा गावच्या भागातून येणार्‍या येणार्‍या पाइपलाइन अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. ही फुटलेली पाइपलाइन अनेक ठिकाणी नाल्यातूनच जाते. यामुळे नाल्याचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळते. विशेष म्हणजे या ठिकाणच्या अनेक पाइपलाइनला गळती सुरू असून या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
आरोग्याचा प्रश्न आहे
हे पाणी अतिशय घाण असून त्यातून प्रचंड दुर्गंधी येते आहे. त्यातून आजाराला आमंत्रणच मिळते आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काशिनाथ खोडे, नागरिक
स्वच्छ पाणी पुरवा
घाण पाणी प्यायचे का? या घाण पाण्यामुळे आम्ही दुसरीकडून पाणी भरतो. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. बदामा चौहान, नागरिक
दोन दिवसांत स्वच्छ पाणीपुरवठय़ाची ग्वाही
नागरिकांच्या तक्रारीनंतर आम्ही या भागात काम सुरू केले आहे. ज्या ठिकाणी समस्या आहे तेथे गळती बंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. दोन दिवसांत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल. - जी.एन. पाटोळे, पाणीपुरवठा अधिकारी, पूर्व विभाग.