आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Turnover Hundred Cr On Gudipadawa Auspicious Beginning

मुहूर्ताची गुढी शंभर काेटींची, अशी झाली उलाढाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात जवळपास शंभर काेटींची उलाढाल झाल्याचे चित्र शुक्रवारी (दि. ८) दिसून आले. इतिहासात पहिल्यांदाच गुढीपाडव्याच्या दिवशी सराफी पेढ्या बंद राहिल्याने मुहूर्तावरील साेने खरेदी करता अाल्याने गृहिणींचा हिरमाेड झाल्याचे चित्र असतानाच प्रमुख कार वितरकांकडे मात्र उत्साहाचे भरते हाेते. नामांकित कार कंपन्यांच्या वितरकांकडे लाेकप्रिय माॅडेल्सला वेटिंग दिसले. माेटारसायकलच्या वितरकांकडेही डिलिव्हरी घेण्याकरिता गर्दी हाेती, तर रिअल इस्टेटमध्ये तेजीचे वातावरण असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. शहरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर किमान नऊशे कार, तर दीड हजार दुचाकींची डिलिव्हरी देण्यात अाली. इलेक्ट्राॅनिक्स वस्तू, हाेमअप्लायन्सेस, फर्निचर खरेदीही माेठ्या प्रमाणावर झाली.
रिअल इस्टेटमध्येही उत्साह
नाशिककरांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अापल्या नव्या घरात गृहप्रवेश करणे पसंत केले, तर बांधकाम व्यावसायिकांनी नवीन गृहप्रकल्पांचे प्रारंभही केले. किमान १५० फ्लॅटची मुहूर्तावर नोंदणी होऊन बांधकाम व्यवसायाची उलाढाल तीस काेटींवर पाेहाेचल्याचा अंदाज बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला.

नऊशेवर कारची डिलिव्हरी
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वच कंपन्यांच्या प्रमुख वितरकांकडे ग्राहकांची गर्दी दिवसभर हाेती. एकाच दवसात जवळपास नऊशे कारची डिलिव्हरी वितरकांनी केल्याचे सांगितले गेले. काही कंपन्यांच्या माॅडेल्सला एक ते तीन महिन्यांपर्यंत वेटिंग असल्याचे दिवाळीसारखेच चित्र गुढीपाडव्याला दिसले.

सराफी पेढ्या बंदच
मुहूर्तावरची खरेदी म्हणून सराफी पेढ्यांना गुढीपाडव्याला झळाळी मिळाल्याचे दरवर्षी दसून येते. ग्राहकांकडून साेन्याचे वेढे, बिस्कीट, नाणे, दागिने यांची खरेदी माेठ्या प्रमाणावर हाेते. मात्र, यंदा अबकारी कराच्या विराेधात सराफी व्यावसायिक बेमुदत संपावर असल्याने शहरवासीयांना अशा खरेदीला मुकावे लागले, तर गृहिणींचा हिरमाेड झाला. सर्वच लहान-माेठ्या सराफी पेढ्यांचे ‘शट डाउन’ असल्याचे दिसले.

१५० फ्लॅटचे व्यवहार
^गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत जवळपास १५० फ्लॅटची नोंदणी झाली असून, रिअल इस्टेटमध्ये चैतन्याचे वातावरण सुरू झाले अाहे. -जयेश ठक्कर, माजीअध्यक्ष, क्रेडाई, नाशिक
१५० दुचाकींची डिलिव्हरी

^गतवर्षा इतकीच म्हणजे१५० माेटारसायकल्सची डिलिव्हरी पाडव्याच्या मुहूर्तावर अाम्ही दिली. शहरात जवळपास दीड हजारांवर माेटारसायकल्सची डिलिव्हरी एका दिवसात झाली असावी. -जयेश माणेक, विक्रीव्यवस्थापक, नामांकित दुचाकी विक्री दालन

२०० कारची डिलिव्हरी
^मुहूर्तावर अाम्ही२०० कारची डिलिव्हरी दिलीे. मागील वर्षी हा अाकडा २७० हाेता. वाहन विक्री क्षेत्रात यंदा वातावरण चांगले असून, सर्व कंपन्या मिळून नऊशेच्या अासपास कारची डिलिव्हरी झालीे. -राजेश कमाेद, ग्रुपसीईअाे, नामांकित कार विक्री दालन

दीड हजार माेटारसायकल्सची विक्री
माेटारसायकल वितरकांच्या अनेक दालनांत वाहनांची डिलिव्हरी घेण्यासाठी ग्राहकांची लगबग दिसली. दिवसभरात सर्वच प्रमुख वितरकांनी दीड हजारांवर माेटारसायकल्सची डिलिव्हरी दिल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला.