आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई रडू नकोस. मला झाडाखाली सोडून निघून जा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक -मुलाच्या मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांनी घर विकले., कर्ज काढले.. तब्बल सात शस्त्रक्रिया त्याच्यावर झाल्या; पण यश मात्र लाभले नाही. त्याला आई-बाबांच्या अश्रुंचा अर्थ उमजला. अखेर त्यानेच सांगितले, ‘आई मला एखाद्या झाडाखाली सोडून दे. तू निघून जा. माझ्यासाठी तू रडू नकोस..’ चुंचाळेच्या सातवर्षीय तुषार किरण कासार याची ही व्यथा!

त्याचे मूत्रपिंड जन्मत:च शरीराबाहेर असल्याने या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. अहमदाबाद येथील इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसिज अँण्ड रिसर्च सेंटरने या आजाराचे आव्हान स्वीकारले. मात्र, उपचारासाठी साडेचार लाख रुपयांची त्यांनी मागणी केली आहे. तुषारला आता समाजातून मदतीचा ओघ येणे गरजेचे आहे. त्यासाठी 7350538421 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा किरण कासार यांच्या बँक ऑफ इंडियाच्या 082610110000861 या खाते क्रमांकावर मदत द्यावी, असे आवाहन तुषारच्या आईने केले आहे.