आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणीनंतर "आ-ला कार्टे'ची सेवा सुरू होईल १५ मिनिटांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - टीव्ही वाहिन्यांसंबंधी स्टार कंपनीने आ ला कार्टे प्रणाली सुरू केल्याने प्रत्येक चॅनेलसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जात आहे. मात्र, ग्राहकांकडून मागणी आल्यानंतरच मल्टी सिस्टिम ऑपरेटरकडूनच (एमएसओ) ते सुरू करण्याची आवश्यकता नाही, तर एमएसओंनी त्यांच्या सर्व्हरचे अॅक्सेस केबल चालकांनाच दिल्याने ते आपल्याच मोबाइलवरून ग्राहकांना हवे असलेले चॅनेल्स पंधरा मिनिटांत सुरू करून देऊ शकतील. केवळ त्यासाठी संबंधित चॅनेल्सचे पैसे केबल चालकास ग्राहकांनी आगाऊ देणे आवश्यक आहे.

डिजिटलायझेशनच्या निर्णयानंतर केबलचालक, एमएसओ आणि शासन यांच्यात वाद सुरू आहेत. त्यातच आता आ ला कार्टेनुसार प्रत्येक चॅनेल्ससाठी स्वतंत्र शुल्क आकारण्याचा स्टार कंपनीने निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार ग्राहकांना हव्या असलेल्या चॅनेल्ससाठी स्वतंत्र पैसे द्यावे लागणार आहेत. त्यासाठी केबल चालकांकडे मागणी अर्ज देेणे आवश्यक असून, मागणी अर्ज देतेवेळीच पैसे दिल्यास लागलीच ग्राहकांच्या सेट-टॉप बॉक्सवर केबलचालक आपल्या मोबाइल फोनवरून एमएसओंच्या सर्व्हरवर जाऊन ग्राहकाला अपेक्षित चॅनेल्सही सुरू होईल. त्यामुळे ग्राहकांनी केबल चालकांकडूनच चॅनेल्स सुरू करून घ्यावे.
केबल चालक आणि एमएसओंमध्ये पुन्हा वाद : ग्राहकांकडूनमागणी अर्ज केबल चालकांनीच भरून घेत, त्यांना हवे असलेले चॅनेल्स तत्काळ सुरू करून द्यावेत, असे एमएसओंचे म्हणणे आहे. मात्र, ते तसे करत नसून जाणीवपूर्वक अर्जच भरून घेत नसल्याचाही आरोप एमएसओ करत आहेत. दुसरीकडे, दरांच्याबाबत एमएसओ केबलचालकांना विश्वासातच घेत नाही. ब्रॉडकास्टर्सकडून विशिष्ट चॅनेल्सचे दर प्रचलित दरापेक्षाही कमीच किमतीत घेतात. केबलचालकांना त्याबाबत कल्पना देता परस्पर त्याचे वाढीव दर आकारतात. मग केबलचालकही मर्जीनुसार ग्राहकांना दर आकारत असल्याचे समर्थन केबलचालक करत आहेत. मात्र, यात ग्राहकांचीच फसवणूक होत असल्याने ग्राहकांनीच याबाबत योग्य निर्णय घ्यायचा आहे.
प्रत्येक चॅनेल्सचे दरपत्रक एमएसओंनी जाहीर करण्याची मागणी केबलचालक करत असून, तसे झाल्यास ग्राहकांची फसवणूक होणारच नसल्याचा दावा ते करत आहेत. पण, दरपत्रक छापण्यापूर्वी केबल चालक ग्राहकांकडून अर्जच भरून घेत नसल्याचा आरोप एमएसओंकडून केला जात आहे. चॅनेल्सचे दर संबंधित ब्रॉडकास्टर्सच्या संकेतस्थळावर शासनाने निश्चित केलेल्यानुसारच आहे. त्यामुळे एमएसओ अधिक दर कसे आकारतील? पण केबलचालक मात्र मनाप्रमाणे दर आकारत असल्याचे एमएसओंचे म्हणणे आहे.