आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TV, Fridge Fire Because Of High Voltage, Divya Marathi

विद्युत दाब वाढल्याने जळाले टीव्ही, फ्रीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिकरोडच्या जगताप मळा परिसरात रविवारी दुपारी अचानक विद्युत दाब वाढल्याने आलिशान पार्क सोसायटीतील आठ रहिवाशांचे टीव्ही, फ्रीज, सेट टॉप बॉक्स, संगणक जळाले. याबाबत उपनगर पोलिसांना माहिती कळविण्यात आली आहे.या भागात 15 दिवसांपासून 4- जीसाठी भूमिगत तारा टाकण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरण कंपनीच्या भूमिगत वीजतारा तुटल्या होत्या. त्यामुळे ही सोसायटी दोन दिवस अंधारातच होती. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात या तारा जोडण्यात आल्या.
मात्र, त्या व्यवस्थित जोडल्या नसल्याने रविवारी अचानक विद्युत दाब वाढला. त्यामुळे सोसायटीतील काही दुकानांमध्ये शॉटसर्किट होऊन उपकरणे जळाली, तर काही घरांमधील पंखे, टीव्ही, फ्रीज, संगणक जळाल्याने मोठे नुकसान झाल्याचे सोसायटीतील रमेश जाचक, सीताराम पोरजे, नामदेव गिते व डॉ. सुधा ठक्कर यांनी सांगितले.