आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twele Years Gone But Unemployed Not Getting Allowance

तप उलटून गेले तरीही राज्यातील बेरोजगारांना मिळेना भत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे नाशिक विभागात सुमारे तीन लाख बेरोजगार तरुण तब्बल एक तपापासून बेरोजगार भत्त्यापासून वंचित आहेत. उच्च शिक्षणासाठी शासनाने 1989 पासून हा भत्ता देण्याची योजना सुरू केली होती. मात्र, हा भत्ता बेरोजगारांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे वारंवार आल्याने 2000 पासून शासनाने ही योजनाच बंद केली. बेरोजगारांच्या बोगस नावाखाली अधिकार्‍यांनी पैसे लंपास केल्याच्याही तक्रारी आल्याने शासनाने बेरोजगारांची सहकारी संस्था स्थापन करून त्या माध्यमातून भत्ता देण्याचेही सुरू केले. मात्र, यामध्येही नोंदणीकृत बेरोजगारांपर्यंत भत्ता पोहोचत नाही.

नाशिक विभागात तीन लाख 82 हजार नोंदणीकृत बेरोजगार असून, त्यांना अजूनही भत्ता मिळत नाही. तालुकास्तरावरील अधिकार्‍यांनीच त्यांना भत्त्यापासून वंचित ठेवल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. भत्ता वाटपाबाबात शासनाने तालुकास्तरावर तपासणी केली असता, कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे आढळल्याने शासनाने ही योजना बंद केली. त्यानंतर बेरोजगार सेवा सहकारी संस्था स्थापन करून सभासदांना तीन तप उलटून गेले मात्र बेरोजगारांना मिळेना भत्ता
हप्त्यात वर्षाला बाराशे रुपये देण्यास सुरुवात केली. त्यातही या संस्थांत बोगस बेरोजगारांची गर्दी झाल्याने गरजू बाजूलाच राहिले. त्यामुळे शासनाने या संस्थांचीही तपासणी सुरू केली आहे. बेरोजगार भत्ता वाटपात आणि सहकारी संस्थांच्या नियमात अनेक त्रुटी शासनाच्या आणि यशदा संस्थेच्या तपासणीत आढळून आल्या.

एकदाही भत्ता मिळाला नाही
मी रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयात नाव नोंदविल्यापासून एकदाही मला बेरोजगार भत्ता मिळाला नाही. संदीप बोराडे, बेरोजगार


नोंदणीकृत बेरोजगारांची जिल्हानिहाय संख्या
जिल्हा बेरोजगार
नाशिक 1 लाख 22 हजार 891
जळगाव 1 लाख 2 हजार 161
धुळे 50 हजार 272
नंदुरबार 17 हजार 52
नगर 89 हजार 765


नवीन प्रस्ताव पाठविला
त्रुटीमुळे बेरोजगारांना भत्ता मिळत नाही. त्यामुळे त्यांना थेट रक्कम देण्यापेक्षा नोकरी अर्ज भरून डी. डी. तसेच पोस्टेज खर्चासाठी मदत मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सुनील सैंदाणे, उपसंचालक, रोजगार व स्वयंरोजगार विभाग