आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास केला,रात्री बाहेर पडला सकाळी सापडला तो मृतदेहच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - तालुक्यातील चिंचोलीपिंप्री येथील रहिवासी आणि फत्तेपूर येथील बारावीतील विद्यार्थी नीलेश पंडित बेटोदे या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. पोलिसांनी तपासचक्रे फिरवताच संशयित आरोपी नजरेच्या टप्प्यात असल्याचे पोलिस निरीक्षक नजीर शेख यांनी सांगितले.
नीलेश पंडित बेटोदे (वय १८) हा चिंचोलीपिंप्री येथील रहिवासी असून फत्तेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या कला शाखेतील विद्यार्थी आहे. नीलेश गावी राहून महाविद्यालयात दररोज ये-जा करतो. तो नेहमीप्रमाणे सोमवारी महाविद्यालय सुटल्यानंतर घरी आला. आईने सांगितल्यानंतर शेतातून म्हशीला चारा घेऊन आला. त्यानंतर वडील जळांद्री येथे वाॅचमन म्हणून कामावर असल्याने आईने तयार करून दिलेला जेवणाचा डबा देण्यासाठी जळांद्रीला गेला. डबा देऊन आल्यानंतर घरी जेवण केले शौचास जाऊन आल्यानंतर अभ्यासाला बसला.

रात्री १० वाजेदरम्यान घराबाहेरून कुणीतरी आवाज दिल्याने नीलेश घराबाहेर गेला, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सध्या यात्रा सुरू असल्याने नीलेश मित्रांसोबत यात्रेला गेला असावा, म्हणून कोणी जास्त शोधाशोध केली नाही, अशी माहिती त्याची आई बहिणींनी पोलिसांना दिली. जामनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नजीर शेख, पोलिस उपनिरीक्षक बारकू जाने, विशाल पाटील सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरु केली. याबाबत नीलेशचा चुलतभाऊ योगेश सीताराम बेटोदे याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात जामनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.

पुढे वाचा... घराजवळच आढळला मृतदेह