आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ते स्वच्छतेसाठी अडीच कोटींचे यंत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील रस्त्यांवरील कचरा धूळ साफ करण्यासाठी पालिकेने प्रत्येकी सव्वा कोटी रुपयांचे दोन टीपीएस स्वीपर घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सिंहस्थ काळात ते वापरले जाणार असून, २.५० कोटी रुपये खर्च होणार आहे. बुधवारी महात्मानगर कॉलेज रोड येथे या यंत्राने सफाई करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
गुजरात येथून खास प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी हे यांत्रिक वाहन नाशकात आणण्यात आले होते. सिंहस्थ काळात शहरातील रस्ते चकाचक असावेत यासाठी तीन वर्षांपूर्वीच हे यांत्रिक वाहन खरेदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. आरोग्य विभागाने यासाठी प्रस्ताव तयार केल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. पवार यांनी दिली.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील डांबरी रस्ते स्वच्छ करण्यासाठी पालिकेच्या वतीने नवीन टीपीएस स्वीपर मशीन विकत घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. गुजरात येथून आणण्यात आलेल्या या यंत्राने कॉलेजरोड महात्मानगर परिसरात रस्ते स्वच्छ करण्याचा डेमो करून दाखवला.

अशी आहे टीपीएस स्वीपर यंत्राची रचना
रस्त्यावरील कचरा साफ करण्यासाठी यंत्राच्या मध्यभागी एक मोठा लांबट ब्रश असून, दोन्ही बाजूला असे दोन गोलाकार ब्रश आहेत.
धूळ उडू नये यासाठी यंत्रात पाण्याची जोडणी करण्यात आली आहे. या जाेडणीतून पाण्याची फवारणी करता येते.
यंत्रात सक्शन असल्याने सर्व कचरा आत ओढला जातो.
रस्ता दुभाजकाजवळील दोन्ही बाजूला साठलेली माती ब्रशने खरवडून काढता येते.
एक तासात १० कि.मी.पर्यंतचा रस्ता स्वच्छ करता येऊ शकतो.
टीपीएस स्वीपर यंत्र हायड्रोलिक पद्धतीने सर्वत्र फिरवता येऊ शकते.
दगड, विटा, माती, गाळ, पाला पाचोळा उचलण्याची सोय.
बातम्या आणखी आहेत...