आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या आत्महत्येप्रकरणी एकास कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- देवळाली कॅम्प येथील दोन अल्पवयीन मुलांच्या रेल्वेखाली झालेल्या आत्महत्याप्रकरणी अमित अपना बाजारचे मालक देवेनशेठ रोहेरा यांचा मुलगा अमित यास रेल्वे पोलिसांनी अटक करून मंगळवारी मनमाड येथील रेल्वे कोर्टापुढे हजर केले. त्यास 3 दिवसांची म्हणजे 8 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

दुकान मालकाने केलेला अपमान सहन न झाल्याने कुणाल जाधव व मयूर कोकाटे या दोन अल्पवयीन मुलांनी रविवारी रात्री रेल्वेखाली आत्महत्या केली. ही मुले ज्या दुकानात होती, त्या दुकानाचे संचालक रोहेरा व मुलगा अमित यांनी या मुलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. संतप्त नागरिकांनी मोर्चा काढल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली होती. हा गुन्हा रेल्वे हद्दीत घडल्याने मंगळवारी त्यांना न्यायालयात आणले होते.

दुकानातून खाद्यतेलाचा डबा चोरल्याचा आरोप करून मारहाण व जातिवाचक शिवीगाळमुळे अपमानित झाल्याने दोन मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याच्या प्रकरणी तपास करण्यासाठी लोहमार्ग पोलिस ठाण्याने एस. पी. राठोड यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मंगळवारी राठोड यांनी पदभार स्वीकारून घडलेल्या गुन्ह्याचा अभ्यास केला. दरम्यान, दुकानाचे संचालक देवन शेठ फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, व आत्महत्यो केलेल्या मुलांना न्याय देण्यात येईल असा विश्वास विशेष तपास पोलिस अधिकारी एस. पी. राठोड यांनी व्यक्त केला.
देवळाली कॅम्प येथील अमित अपना बाजार परिसरात मंगळवारी पोलिस बंदोबस्त होता.