आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-नाशिक महामार्गावरील दाेन कारच्या धडकेत सहा जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - मुंबई-नाशिक महामार्गावर सिडकोतील स्टेट बँकेजवळ दोन कारच्या धडकेत सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यात या दोन्ही कारचे नुकसान झाले. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

नाशिककडून मुंबईकडे वेगाने जाणारी मारुती आर्टिका (एम. एच. १५ इएक्स २२१२) या कारचे पुढील टायर फुटल्याने ती दुभाजकावर अादळली दुभाजक ओलांडून विरुध्द दिशेला आली. याच वेळी समोरून आलेल्या वॅगनआरने (एमएच १५ डीएस ८१२४) आर्टिकाला धडक दिली.यात दोन्ही कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला. यात निखिल पाटील, वैष्णव घोरपडे, निखिल कुकरेजा, सिद्धांत शेजवळ, धनंजय तुंगार निखिल जोशी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातातील काही युवक हे पंचवटीतील एका महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे समजते. पुढील तपास अंबड पोलिस करीत आहेत. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने दाखल होत वाहतूक नियंत्रित केली.