आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मुलांचा तलावात बुडाल्याने मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घरातूनकाही सांगता पोहण्यास गेलेल्या दोन पंधरा वर्षीय मुलांचा तलावात मृत्यू झाला. मंगळवारी (दि. ११) सकाळी दोघांचे मृतदेह आडगाव पाझर तलावातून अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधून बाहेर काढले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण मुराजी बोरगे (१५) समाधान ज्ञानेश्वर कांबळे ( १५, दोघे रा. धात्रक फाटा, आशापुरी सोसायटी परिसर) हे दोघे सोमवारी (दि. १०) दुपारी वाजेपासून घरातून काही सांगता गेले होते. मंगळवारी (दि. ११) सकाळी समाधानचे कपडे आणि सँडल ग्रामीण पोलिस मुख्यालयामागील आडगाव पाझर तलावाजवळ मिळाले. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तलावात शोध घेतला असता दोघांचे मृतदेह मिळून आले. वैद्यकीय तपासणीमध्ये दोघांचा मृत्यू मंगळवारी सकाळी पाण्यात बुडून झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...